मालेगाव

टी. आर. विद्यालयात महापरिनिर्वाण दिन उत्साहात साजरा.

प्रबंधभूमी महाराष्ट्र न्युज
दाभाडी : क. भा. हिरे शिक्षण संस्थेच्या टी. आर.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज दाभाडी येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्रीमान एस. आर. निकम सर उपस्थित होते.विद्यालयातील विद्यार्थ्यांनी महामानव  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आपले मनोगत व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दिव्यानी खैरनार,खुशाली खैरनार,डिंपल कुवर,साई पवार, ललित जाधव, पियुष निकम, वैष्णवी काकूळते,दिव्यांनी निकम,दिया निकम, प्रिया सोनवणे, श्रावणी निकम,पृथ्वी निकम, दिनेश देवरे,कुणाल आढाव इत्यादी विद्यार्थ्यांनी वकृत्व स्पर्धेत भाग घेतला. 
इयत्ता पाचवी ते सातवीच्या गटात -प्रथम क्रमांक -दिव्यानी खैरनार, इयत्ता आठवी ते दहावीच्या गटात -प्रथम क्रमांक -साई पवार व पृथ्वी निकम, द्वितीय क्रमांक -श्रावणी निकम.तृतीय क्रमांक -पियुष निकम इयत्ता अकरावी ते बारावीच्या गटात - प्रथम क्रमांक कुणाल आढाव, द्वितीय क्रमांक - दिनेश देवरे यांनी मिळवला सदर विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.तसेच वर्षभराच्या कार्याची दखल घेऊन विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्रीमान मनीष निकम यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. शिक्षक वक्त्यांमधून सुधाकर निकम व किशोर बच्छाव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक नवनाथ चित्ते यांनी केले. अध्यक्ष भाषणातून प्राचार्य एस. आर. निकम यांनी  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या पद्धतीने खडतर मार्गाने आपले शिक्षण घेऊन आपल्या ज्ञानाचा वापर देशहितासाठी आणि समाज उपयोगी कार्यासाठी केला. त्याच पद्धतीने  विद्यार्थ्यांनी शिकून संघटित होऊन संघर्ष करायला शिकले पाहिजे. आपला ज्ञानाचा वापर आपल्या देशहितासाठी आणि सामाजिक कार्यासाठी करावा असा मोलाचा संदेश दिला. कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य एस. आर. निकम,उपप्राचार्य व्ही.के.चव्हाण,पर्यवेक्षक सी.ए.निकम, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related News