देवळा

वंचित बहुजन आघाडीकडून चांदवड-देवळा विधानसभा मतदार संघात सामान्य कार्यकर्त्याला न्याय... दिगंबर उर्फ बाळा जाधव यांना चांदवड-देवळा विधानसभा मतदार संघाची उमेदवारी जाहीर.

वासोळ/वैभव केदारे
वंचित बहुजन आघाडीकडून चांदवड-देवळा विधानसभा मतदार संघात एका सामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला असून दिगंबर उर्फ बाळा जाधव यांना उमेदवारी देण्यात आली.
गेल्या आठ वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या जाधव यांनी भारिप बहुजन महासंघाचे देवळा तालुकाध्यक्ष पदापासून पक्ष संघठण व मोर्चा बांधणीचे काम केले आहे.त्याचीत पावती म्हणून पुढे त्यांना  वंचित बहुजन आघाडी देवळा तालुकाध्यक्ष पदाची धुरा देण्यात आली.तालुका पातळीवर जाधव यांनी  वंचित बहुजन आघाडीचे एकनिष्ठ काम केल्याने त्यांच्या कामाला न्याय देत पक्षाने पुढे त्यांना नाशिक पूर्व जिल्हाउपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली.एक सामान्य कार्यकर्ता ते जिल्हाउपाध्यक्ष पद हे जाधव यांनी आपल्या कार्य कौशल्याने मिळवले.वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी तसेच महाराष्ट्र कार्यकारणीने जाधव यांची पक्षाशी असलेली एकनिष्ठता,कामाची पद्धत बघून त्यांना होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत चांदवड - देवळा मतदार संघाची उमेदवारी जाहीर करण्यात आली.उमेदवारी जाहीर झाल्याने दिगंबर उर्फ बाळा जाधव यांनी पक्ष श्रेष्टिंचे आभार मानले आहेत.एका सामान्य कार्यकर्त्या  वंचित बघुजन आघाडीने न्याय दिल्याचे बोलले जात आहे.

Related News