प्रबंधभूमी महाराष्ट्र न्युज
लखमापूर : अहिरेश्वर मेडिकल एज्युकेशनल रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन संचलित साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लखमापूर येथील इयत्ता १२ वी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी प्रणाली नितीन पवार हिने डिजिटल प्रेस मीडिया कौन्सिल द्वारे आयोजित जी - २० स्कूल क्विझ स्पर्धेत शाळा स्तरावर प्रथम व जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावित यश संपादन केले.
शाळेत द्वारे या परीक्षेत एकूण ४२ विद्यार्थी सहभागी झाले होते. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली.
प्रणालीला सदर परीक्षेसाठी परीक्षा समन्वयक प्रा. डी.जी. काळे यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.
प्रणालीच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक चेअरमन अँड. शशिकांत अहिरे, प्राचार्या प्रा. रोशनी अहिरे, यांच्यासह संचालक मंडळ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.