शरद पवार | प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज
देवळा - तालुक्यातील भऊर येथे सालाबादप्रमाणे ग्रामदैवत पिर साहेब बाबा यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ३० नोव्हेंबर, १ व २ डिसेंबर असा तीन दिवस हा यात्रा उत्सव भरविण्यात येणार असल्याची माहिती यात्रा कमिटीच्या अध्यक्ष काशिनाथ पवार उपाध्यक्ष गंगाराम पवार व सदस्य यात्रा उत्सवाची सुरवात शनिवार दि. ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वा. पिरसाहेब मिरवणुकीने होणार आहे. सायंकाळी रथाला सुशोभित करुन वाजत गाजत गावातून भव्य मिरवणूक काढण्यात येईल. रात्री ९ वाजता
नागारीकांच्या मनोरंजनासाठी प्रथेप्रमाणे लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात येणार आहे. दि. १ व २ डिसेंबर असे दोन दिवस यात्रा उत्सवाचे आयोजन गावात करण्यात येणार आहे. या वर्षांपासून प्रथमच कुस्त्यांची दंगल ही , सोमवारी भरविण्याच्या निर्णय यात्रा कमिटीने घेतला आहे. दि. २ डिसेंबर रोजी दुपारी ३ वा. ही कुस्त्यांची भव्य दंगल होणार असल्याची नोंद परिसरातील नामवंत मल्लांनी घेऊन कुस्तीच्या दंगलीसाठी मोठ्या संख्येने हजेरी लावावी असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आलेली आहे