वैभव पवार | सोपान सोनवणे
प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज
खालप ता.देवळा येथील कै. सोजाबाई सुपडू सुर्यवंशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, त्यांच्या कुटुंबियांनी प्रथम पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमानिमित्त गावाला वैकुंठ रथ भेट दिला आहे. त्यांच्या समाजसेवेच्या विचारांचा वारसा पुढे नेत, हा उपक्रम गावासाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरला आहे. अंत्यविधीसाठी आवश्यक असलेली ही सुविधा गावातील प्रत्येक गरजू कुटुंबाला विनामूल्य उपलब्ध होणार आहे.
खालप ता.देवळा येथील प्रगतिशील शेतकरी भिमाजी सूर्यवंशी व वैभव लक्ष्मी ऍग्रो यांच्या तर्फे आईच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रथम पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमानिमित्त वैकुंठरथाचे लोकार्पण महंत ह.भ.प. गणेशपुरी महाराज,देवळा नगरपंचायतीचे गटनेते संभाजी आहेर,देवळा बाजार समितीचे सभापती योगेश आहेर, संचालक भाऊसाहेब पगार,माजी संचालक जगदीश पवार,सरपंच शशिकांत सूर्यवंशी,सामाजिक कार्यकर्ते जिभाऊ सूर्यवंशी,दिनेश सोनार,रावण सूर्यवंशी,दौलत सूर्यवंशी,गयाबाई पवार ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या वेळी आईच्या भावपूर्ण स्मृतीचे छायाचित्र समोर ठेवून, कुटुंबाने गावातील नागरिकांसमोर हा रथ समर्पित केला. गावातील मान्यवर, सरपंच, आणि नागरिकांनी या उपक्रमाचे भरभरून स्वागत केले. अनेकांनी या दानशीलतेचे कौतुक करत, कुटुंबाच्या या समाजसेवेसाठी आभार मानले.
यावेळी अरविंद सूर्यवंशी , श्री दिगंबर सूर्यवंशी, श्री बारकू सूर्यवंशी उपसरपंच मुरलीधर अहिरे श्री कपिल सूर्यवंशी श्री नानाजी मोरे, सुनील सूर्यवंशी, राकेश सूर्यवंशी, फुलाजी सूर्यवंशी, संजय बच्छाव आदींसह ग्रामस्थ,नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिक्रिया
समाजात जगत असताना आपल्याला समाजाचे काही ना काही देणं असतं ते आजीच्या स्मरणार्थ ग्रामस्थांच्या सहकार्याने व कुटुंबातील ज्येष्ठांनी दिलेल्या अनुमोदनामुळे वैकुंठरथाची संकल्पना सुचवुन तो आज लोकार्पण झाले त्याचे समाधान झाले आहे.
- अविनाश सुर्यवंशी,खालप