देवळा

व्ही.के.डी. इंग्लिश मीडियम स्कूल भावडे येथील विद्यार्थ्यांची बॉल बॅडमिंटन स्पर्धेत राज्यस्तरावर निवड

वैभव पवार, प्रबंधभूमी महाराष्ट्र न्युज
देवळा : एस.के.डी. इंटरनॅशनल स्कूल व व्ही.के.डी. इंग्लिश मीडियम स्कूल भावडे, येथील मैदानावर पार पडलेल्या विभाग स्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत विभागातील दिग्गज संघांनी सहभाग नोंदविला. सदर स्पर्धेत एस.के.डी. चारिटेबल ट्रस्ट नाशिक संचलित व्ही.के.डी. इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भावडे, येथील विद्यालयाच्या चौदा वर्ष वयोगटा च्या आतील मुलींच्या संघाने गुरुगोविंद सिंग स्कूल नासिक, यांच्याविरुद्ध चुरशीच्या अंतिम सामन्यात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत, दणदणीत विजय मिळवला. व्ही.के.डी. स्कूलचा संघ थेट राज्यस्तरासाठी पात्र ठरला. दिव्यानी वाघ,अनिषा मोरे,खुशाली कापडणीस, ईश्वरी काकुळते, समृद्धी देवरे, तन्वी देवरे, गुंजन पगार, प्रियंका बच्छाव, ग्रीष्मा पगार, नूतन शिरसाठ या खेळाडूंचे व विजयी झालेल्या संघाचे संस्थेचे अध्यक्ष संजय देवरे सेक्रेटरी मीना देवरे व विद्यालयाचे प्राचार्य एन. के. वाघ यांनी अभिनंदन केले. विजयी संघाला विद्यालयाचे क्रीडाशिक्षक यज्ञेश आहेर, निलेश भालेराव यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सागर कैलास, बबलू देवरे, हेमंत शिंदे यांनी विजयी संघाचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Related News