मालेगाव

एज्युकेअर इंग्लिश मिडीयम स्कूल सोयगाव येथे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी वाचन प्रेरणा दिन साजरा

प्रबंधभूमी महाराष्ट्र न्युज
मालेगाव : एज्युकेअर इंग्लिश मिडीयम स्कूल सोयगाव येथे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा शिल्पा देशमुख यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन केले. शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आपल्या  भाषणातून सांगितले.  शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली जैन यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकला. शाळेतील सर्व विदयार्थी आपले आवडते पुस्तकाचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री अहिरराव यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी आशा हिरे, रुपाली देसले, नीलिमा वाघ,  क्रांती कांबळे, शुभांगी शुक्ला, मयुरी गुंजाळ, ऋतुजा खैरनार, वैष्णवी जाधव, तुषार अहिरे, साजिद खान, धीरज अहिरे, संजय पवार, चेतन निकम, प्रतीक्षा शिंदे, रत्ना सूर्यवंशी उपस्थित होते.

Related News