वैभव केदारे, प्रबंधभूमी महाराष्ट्र न्युज
वासोळ ता.देवळा येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी मंगल काशिनाथ महिरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.मावळते उपसरपंच संजय खुरसाने यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने दि.०७ रोजी वासोळ ग्रामपंचायतीच्या सभागृहात सरपंच स्वप्नील पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उपसरपंच निवड बैठकीत महिरे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी नंदू सोनवणे यांनी कामकाज पाहिले.यावेळी ग्रा.प.सदस्य भारत आहिरे,दरबारसिंग गिरासे,इंदुबाई केदारे,अलका पगार,भिकुबाई पवार,अनुसयाबाई गवळी,आदींसह मा.सरपंच दगडू भामरे,चंद्रकांत पाटील,दगा अहिरे,काशिनाथ महिरे पो.पाटील कैलास खैरनार उपस्थित होते.महिरे यांच्या निवडीने परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.