वैभव पवार | वि.संपादक
प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज
देवळा तालुक्यातील फुलेनगर येथे यशदा पुणे मित्रा यांच्यावतीने अटल भूजल योजनेचे ग्रामस्तरावरील प्रशिक्षण संपन्न झाले.
फुलेनगर येथे दि.२८ सप्टेंबर रोजी पुणे येथील यशदा मित्राच्या वतीने अटल भूजल प्रशिक्षण पार पडले.या प्रशिक्षणामध्ये शेतकरी उत्पादक कंपनी शेतमाल उत्पादन आणि बाजारपेठ जोडणी, सामूहिक शेती, शेतकऱ्यांचे गट, शेतकऱ्यांची कंपनी त्यांची नियमावली त्यांचे फायदे पुढील काळात शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी सामूहिक शेती कशी फायदेशीर ठरणार याविषयी सविस्तर माहिती प्रशिक्षक स्मिता बहादुरे व सहाय्यक प्रशिक्षक सरला सोनवणे यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी सरपंच निंबा अहिरे, उपसरपंच पुंजाराम बागुल,खंडू शेवाळे,वसंत बागुल,किरण खैरनार, अनिकेत शेवाळे,निलेश खैरनार,राहुल बागुल,कृष्णराज बागुल आदिंसह मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.