देवळा

देवळा तालुक्यातील वाढत्या चोऱ्या व अवैध धंदे रोखण्यास पोलीस कमी पडत असून याविरोधात दिनेश अहिरेचे तहसीलदारांना निवेदन..!

वैभव पवार | वि.संपादक
प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज

देवळा तालुक्यात वाढती गुन्हेगारी तसेच कायदा सुव्यवस्था ढासळलेली असून भर दिवसा घरफोडी ,चोऱ्या अवैध धंद्याकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष याविरोधात शिवसेनेचे नाशिक ग्रामीण मालेगाव विभागाचे जिल्हाध्यक्ष दिनेश आहिरे यांनी  निषेधार्थ मोर्चा काढत देवळा तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांना निवेदन सादर केले.
       निवेदनाचा आशय असा की' देवळासह तालुक्यात वाढत चाललेली गुन्हेगारी कायदा सुव्यवस्था ढासळत चालली असून घर फोडी ,चोऱ्या ,अवैध धंद्याची मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे ,याकडे पोलिस प्रशासन डोळेझाक करत असल्याने पोलीस प्रशासनाच्या विरोधात शिवसेनेचे नाशिक ग्रामीण मालेगाव विभागाचे जिल्हाध्यक्ष दिनेश आहिरे यांनी मंगळवार दि.२४ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते देवळा पोलिस ठाण्यापर्यत निषेधार्थ मोर्चा काढत देवळा तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांना निवेदन सादर केले.
     वाढत्या गुन्हेगारीमुळे सर्व सामान्य जनता भयभीत झाली असून पोलिस प्रशासन कारवाई करतांना दिसत नाही. दिवसा चोऱ्या व घरफोड्याचे प्रमाण वाढले असून नागरीकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच गोरगरीब जनतेला न्याय देतांना दिसुन येत नाहीत.
तसेच तालुक्यात अवैध धंदे सरासपणे सुरू असून यावर कारवाई होतांना दिसून येत नाही. पोलिस प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी व वाढत्या गुन्हेगारीला आळा घालावा अन्यथा उर्ग स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा आहिरे यांनी दिला आहे.

" तालुक्यातील घरफोडी ,चोरी घटनांची कसून चौकशी सुरू आहे, काही घटनांचा तपास पूर्ण झाला असून पोलिस प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहेत. तसेच अवैध धंद्यावर आम्ही कारवाई करत आहोत ,तसे काही आढळुन आल्यास आम्ही योग्य ती कारवाई करू.
    - ज्ञानेश्वर जाधव ,पोलिस निरीक्षक देवळा

चौकट -
  तालुक्यातील दहिवड येथील चोर चावडी धबधबा येथे पंधरा दिवसांपूर्वी १८ वर्षीय मालेगाव कॅम्प येथील युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याबाबत देवळा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. याबाबत मयत राहुल सोमनाथ काळे यांच्या कुटुंबातील व्यक्तीचे म्हणणे आहे की आमच्या मुलांचा घातपात झाल्याचा कुटुंबाचा संशय असून त्याची सखोल चौकशी करत या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आहिरे यांनी केली आहे.

Related News