चांदवड

चांदवडला केदा आहेरांच्या संकल्पनेतून रोजगार मेळाव्याचे आयोजन ; बेरोजगारांना मिळणार रोजगाराची संधी ; तब्बल चार हजार पदे भरणार..!

वैभव पवार | सोपान सोनवणे
प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज
   नाफेडचे महाराष्ट्र राज्याचे संचालक तथा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या संकल्पनेतुन चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघातील बेरोजगार सुशिक्षित तरुण-तरुणींसाठी महारोजगार मेळाव्याचे ०१ ऑक्टोबर २०२४ मंगळवार रोजी चांदवड येथील मनमाड रस्त्यावरील रेणुका लॉन्स येथे  सकाळी ९ ते ५ या कालावधीत आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यात तब्बल ४ हजार पदे भरली जाणार आहेत.
    या मेळाव्यात महाराष्ट्रातील राष्ट्रीय  व आंतरराष्ट्रीय विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत.निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे.
   चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघातील १० वी, १२ वी उत्तीर्ण/आयटीआय/ पदवीधर उमेदवारांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी वर नमूद पत्त्यावर उपस्थित रहावे, असे आवाहन रोजगार मेळाव्याचे आयोजक केदा आहेर मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Related News