महाराष्ट्र राज्य

जालना - तालुका पोलीस ची कामगिरी बघाच......अभिमान तर वाटणारच....

प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज 
निघुन गेलेले व हरवले 74 व्यक्ती पैकी 61 व्यक्ती चा शोध लावण्यात यश -पोनि सुरेश उनवणे 

निघुन गेलेले व हरवलेले व्यक्ती यांचा तपास करणारे पोकॉ- वसंत धस

 तालुका पोलीस स्टेशनची हद्द ही विस्तृत आणि मोठी असल्याकारणाने एकूण 25 उपनगर आणि 64 गावांचा पोलिस हद्दीमध्ये समाविष्ट आहे,
 तालुका पोलिस स्टेशनच्या हद्दीतील लोकसंख्या मोठी आहे, त्यामुळे हरवलेले किंवा घरातुन निघुन गेलेले प्रमाण अधिक आहे , चालू वर्षात एकूण 74 व्यक्ती तालुका पोलीस स्टेशनमध्ये हरवलेले तक्रार दाखल आहेत, त्यामध्ये 28 पुरुष,आणि 46 महिला असा एकूण 74 हरवलेले आहे. पुरुष हरवलेले  28 पैकी 24 व्यक्ती हे तपासात मिळुन आले, तसेच महिला 46 हरवलेल्या आहे त्यापैकी 39 पोलिस तपासात मिळुन आल्या आहेत एकूण तालुका पोलिस हद्दीतील 61 जन मिळून आले आहेत,
 यामध्ये चार पुरुष आणि नऊ महिला रेकॉर्डवर मिळवण्यासाठी पोलिस तपास सुरू आहे असे कर्तव्यदक्ष तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी सांगितले,
 या सर्व हरवलेल्या महिला व पुरुष यांचा तपास करणारे पोलीस कॉन्स्टेबल म्हणजे वसंत धस हे अहोरात्र मेहनत घेत हरवलेल्या महिला व पुरुष सापडण्याचे आवाहन स्वीकारतात.  पोलिस कॉन्स्टेबल वसंत धस एक ईमानदार पोलिस कर्मचारी त्याचीच पावती म्हणजे त्याच काम हरवलेल्या व घरातुन निघुन गेलेले व्यक्ती त्यांच्या कुटुंबीयांना परत मिळवून दिल्या.

प्रबंधभुमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनिल भारती जालना

Related News