मालेगाव

मराठी भाषेची ओळख करण्यासाठी वाड्मय मंडळाची महत्वाची भूमिका - राजेंद्र दिघे : सोयगाव महाविद्यालयात वाड्मय मंडळाचे उदघाटन

प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज 
मालेगाव -
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मराठी भाषा, साहित्य व संस्कृती समजावी. भाषेची ओळख करण्यासाठी वाड्मय मंडळाची भूमिका अतिशय महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन कवी राजेंद्र दिघे यांनी केले.
सोयगाव येथील मविप्रचे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वाड्मय मंडळ व सांस्कृतिक मंडळ उदघाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ हिरामण क्षिरसागर होते. मंचावर उपप्राचार्य डॉ मनोज जगताप, मराठी विभागप्रमुख डॉ संगिता अहिरे, प्रा. मनोज अहिरे, ग्रंथपाल डॉ. अरुण पठाडे मंचावर उपस्थित होते.कवी राजेंद्र दिघे पुढे म्हणाले की,मराठी वाङ्मयाची आवड निर्माण होऊन त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी प्रत्येक भाषेच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात.पुस्तकी ज्ञाना पलिकडे साहित्याचा अभ्यास विद्यार्थी जीवनात प्रेरक ठरत असल्याने वाचन संस्कृतीची जोपासना करण्यासाठी अशा मंडळानी यापुढे प्रकर्षाने काम करण्याची गरज आहे. वाढती मोबाईल संस्कृती वाचनापासुन दूर जात असल्याचे सांगून साहित्य व सांस्कृतिक उपक्रमाविषयी अभिरुची निर्माण होण्यासाठी विविध वाड्मयीन उपक्रमांची आखणी करावी. यावेळी दोन कविता सादर केल्या.
 प्राचार्य डॉ क्षिरसागर यांनी अध्यक्षीय भाषणात वाङमय व सांस्कृतिक मंडळ अंतर्गत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असतो त्यासाठी महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते असे स्पष्ट केले.मराठी विभाग प्रमुख डॉ.संगीता अहिरे यांनी प्रास्ताविक करून वाङमय मंडळाविषयीची पार्श्वभूमी मांडली.सांस्कृतिक मंडळ प्रमुख प्रा. मनोज अहिरे यांनी सांस्कृतिक मंडळाविषयी माहिती दिली. हिंदी विभाग प्रमुख डॉ. जयवंत पवार यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. वृषाली देसाई यांनी केले.  प्रा. मीनाक्षी काळे यांनी आभार मानले.कार्यक्रमासाठी प्रा. पी.डी. गोणारकर, डॉ.एन. बी. नेरकर प्रा. एल. के. मुठे, प्रा.राजेश गांगुर्डे,प्रा. अश्विनी देशमुख प्रा. सपना गोधडे , प्रा. वैशाली शेजवळ, प्रा. प्रीती वाघ प्रा.महेश जाधव, प्रा.सायली देवरे व सर्व प्रशासकीय सेवक यांनी पुढाकार घेतला.


फोटो ओळी 
सोयगाव: येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वाड्मय मंडळाचे उदघाटन समारंभात बोलताना कवी राजेंद्र दिघे, मंचावर प्राचार्य डॉ हिरामण क्षिरसागर.

Related News