कळवण

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण अंतर्गत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत विठेवाडी दौ.सो.आहेर अनुदानित आश्रमशाळेला विविध स्पर्धेत यश

शरद पवार | प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज
देवळा : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण अंतर्गत  चांदवड, देवळा, मालेगाव, नांदगाव या चार तालुक्यांच्या क्रीडास्पर्धा रामेश्वर आश्रमशाळेत संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये कसमादे परिसर विकास मंडळ संचलित देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील डॉ.दौ.सो.आहेर अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी यश मिळवले. यामध्ये १४ वर्ष वयोगट मुले यात रितेश महाले ७ वी ४०० मी. धावणे प्रथम, सागर राऊत इ.८ वी ६०० मी. धावणे द्वितीय मुली, जया पवार इ.७ वी २०० मी. धावणे प्रथम,  वैशाली बागुल इ.८ वी ४०० मी. धावणे द्वितीय,  कोमल खांडवी ९ वी ६०० मी. धावणे प्रथम, जयश्री खांडवी ८ वी ६०० मी. धावणे द्वितीय, रिले ४×१००मी धावणे १४ वर्ष मुले मुली प्रथम 
१७  वर्ष वयोगट मुले 
किशोर माळी इ.१० वी १५०० मी. धावणे प्रथम 2) अर्जुन पवार इ.९ वी ४०० मी. धावणे प्रथम 3) सोमनाथ सोनवणे इ.१० वी. ८०० मी. धावणे प्रथम 
१७ वर्ष वयोगट मुली 
1) दिव्या पवार इ.१० वी १०० मी. धावणे प्रथम 2) रुपाली जाधव इ.९ वी २०० मी. धावणे प्रथम 3) हर्षदा गावित इ.८ वी २०० मी. धावणे द्वितीय, ज्योती जोपळे ४०० मी. धावणे प्रथम,  अनुसया चौधरी ४०० मी. धावणे द्वितीय, सिधु निकम ८०० मी. धावणे प्रथम, साक्षी पवार ८०० मी. धावणे द्वितीय,  खुशाली गवळी १५०० मी. धावणे प्रथम, अनिता अहिरे १५०० मी. धावणे द्वितीय, वैशाली धुळे ३;हजार मी. धावणे प्रथम 
१७ वर्ष वयोगट 
रिले ४×४०० मी धावणे मुले प्रथम , मुली प्रथम 
 कब्बडी १७ वर्ष वयोगट मुली प्रथम क्रमांक. या यशवंत खेळाडूंना देवळा नगर परिषद गटनेते संभाजी आहेर यांनी आपल्या वाढदिवस निमित्त क्रीडा साहित्य भेट देत गौरव केला.
या खेळाडूंना क्रिडाशिक्षक योगेश अहिरे, यशवंत चौरे व अमोल निकम यांच्यासह शिक्षक व शक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लागले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आ डॉ. राहुल आहेर संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. पोपट पगार चिटणीस कृष्णा बच्छाव खजिनदार रमेश शिरसाठ संचालक विलास निकम प्रशासकीय अधिकारी , दिनकर देवरे माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योत्स्ना सूर्यवंशी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा देवरे, नितीन भामरे भगवान आहेर, सुवर्णा शिरसाट, प्रशांत पवार, अधीक्षक मयूर देवरे आशा बहिरम, अतुल आहेर,  युवराज सावकार, सचिन पवार, आदीनी विध्यार्थाचे कौतुक केले.

Related News