महाराष्ट्र राज्य

जळगाव| तापी नदीच्या पात्रात विसर्जन केलेल्या गणेश मुर्त्यांची नगरपरिषदेच्या वतीने लावण्यात आली योग्य विल्हेवाट

प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज 

सर्वत्र गणेश उत्सव मोठ्या उत्साहात  साजरा करण्यात आला व गणरायाचे विसर्जन देखील मोठ्या उत्साहात झाले. नागरिकांनी गणरायाच्या मुर्त्या तापी नदीच्या पात्रात विसर्जन केल्याने विसर्जना नंतर मुर्त्या या पीओपीच्या असल्याने त्या विरघळल्या नसल्याने तापी नदीच्या पात्रामध्ये विखरलेल्या अवस्थेत पडल्या होत्या. त्यामुळे चोपडा नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या स्वयंपूर्तेने आपल्या कर्मचाऱ्यांना नदीपात्रात उतरू विखरलेल्या गणरायाच्या मुर्त्या एकत्र गोळा करून विधीवत पूजा करून विल्हेवाट लावणार असल्याचे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी सांगितले. यावर्षी गणरायाचे विसर्जन जरी झाले असले तरी पुढील वर्षी घरगुती गणरायाच्या लहान मुर्त्या पीओपीच्या न घेता शाडू मातीच्या गणरायांच्या मुर्त्यांचे प्राण प्रतिष्ठान करून तिची विसर्जन करावे. असे आवाहन नगर परिषदेचे अधिकारी यांनी नागरिकांना केले आहे. यावेळी स्वच्छता निरीक्षक वि के पाटील, पाणीपुरवठा अभियंता श्री जंगले यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. 

 

Related News