प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज
जालन्यातील वडीगोद्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 61 एकर वरील भूखंड लिलावाच्या प्रक्रियेला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. हा लिलाव रद्द झाला पाहिजे,अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.या मागणीसाठी शेतकऱ्यांनी बाजार समितीत उपोषण सुरू केलं आहे. बाजार समितीसाठी
संपादित करण्यात आलेल्या जमिनीला मोबदला मिळावा अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. विकसित भूखंड बाधित कुटुंबांना किंवा शेतकरी कुटुंबांना द्यावा, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र बाजार समिती या शेतकऱ्यांचा विरोध झुगारून देत लिलाव प्रक्रिया पार पाडत आहे.