प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज
रोटरी क्लब मालेगाव फोर्ट च्या वतीने गेल्या चार वर्षांपासून तत्कालीन अध्यक्ष डॉ अरुण पठाडे यांच्या कार्यकाळात चालु झालेला शवपेटीचा प्रकल्प अविरतपने चालू आहे. आजपर्यंत या शवपेटीत मालेगाव शहर व तालुक्यातील 400 पेक्षा जास्त शव या शवपेटीत ठेवण्यात आलेत. बऱ्याच जणांचे नातेवाईक हे बाहेरगावी राहतात, अश्या वेळी मृत्यू झालेल्या व्यक्तीचे शव हे जास्त वेळ टिकावे म्हणून शवपेटीत ठेवले जाते, हा उपक्रम रोटरी क्लब मालेगाव फोर्टतर्फे अविरतपणे चालू असून,*आज रोटरी क्लब मालेगाव फोर्ट च्या वतीने दुसऱ्या शवपेटीचे लोकार्पण आनंद मंगल वृद्धाश्रममध्ये ज्येष्ठ रोटे. किशोरभाई कुटमुटिया, व महाराष्ट्र सरकारचे विशेष सरकारी वकील रोटे.ऍड. शिशिर हिरे यांच्या हस्ते करण्यात आले.* याप्रसंगी क्लब अध्यक्ष रोटे.ऍड. पंकज विभुते, सेक्रेटरी रोटे.संदीप ठाकरे, प्रकल्प प्रमुख दिनेश अहिरे,रोटे.ऍड. निलेश पाटील, रो इंजी प्रशांत कुलकर्णी ,व वृद्धाश्रमातील सर्व वृद्ध उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ मालेगाव फोर्ट मुळे अनेक अपत्यांना आपल्या पालकांचे शेवट चे दर्शन होऊ शकते व अश्या उपक्रमा ची समाजास गरज आहे असे गौरवोद्गार श्री किशोर भाई कुटमुटिया यांनी काढले.या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ मालेगाव फोर्ट तर्फे वृक्षारोपण करण्यात आले. आनंद मंगल वृद्धाश्रम त पथदर्शी मियावकी पद्धतीचे जंगलं निर्माण करण्यात आले असून मालेगाव तालुक्यातील अश्या पद्धतीचा हा पहिलाच वनीकरण च प्रकल्प असल्याचे वानिकरणाचे प्रणेते ऍड शिशिर हिरे यांनी सांगितले. आज रोजी वृद्धाश्रमा-- सुखाष्रमात १८ वयोवृध्द आईं बाबा असून ६ मानसिक दृष्ट्या विकलांग व्यक्ती राहत आहेत. ज्यांचे अपत्य इत्रहा राहत आहेत व त्वरित अंत्यविधी साठी पोहचे शक्य नाही अश्या न साठी शितशव पेटी ची मोठी सोय व उपयुक्तता असते. शितशव पेटी ची आवश्यकता असल्यास व्यवस्थापक बबलु आहिरे मो :- 7875903036, ऍड. निलेश पाटील :- 9850191911,डॉ अरुण पठाडे :- 9860861964 यांच्या शी संपर्क साधता येईल. शवपेटी आनंद मंगल वृद्धाश्रमात-- सुखाष्रम्म नीलगवहन शिवार उपलब्ध असेल असे रोटरी अध्यक्ष ऍड पंकज विभुते व सचिव समीर ठाकरे यांनी सांगितले आहे.