प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज
मालेगांव...
मालेगांव तालुक्यातील मळगांव (ना) ग्रामपंचायतीवर शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते मा. डॉ. अद्वयआबा हिरे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री. सोपान नामदेव साळुंखे यांचा सरपंच पदी दणदणीत विजय होवून मळगांव (ना) ग्रामपंचायतीवर शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचा भगवा फडकला आहे.
श्री. सोपान नामदेव साळुंखे यांनी शिवसेनेच्या सौ. शोभा समाधान शिंगाडे यांचा पराभव केला आहे. शिवसेनेचे उपनेते डॉ. अद्वयआबा हिरे-पाटील यांचे समर्थक ग्रामपंचायत सदस्य सर्वश्री नंदा रविंद्र उशिरे, दादाजी दशरथ सुरंजे, शोभा दादाजी निकम, उपेंद्र नारायण साळुंके, सखुबाई सुभाष गायकवाड यांच्या सहकायनि श्री. सोपान साळुंखे यांची सरपंचपदी निवड झाली.
निवडणुक प्रक्रीया पार पाडण्यासाठी निवडणुक निर्णय अधिकारी श्री.डी.एस. करंडे, ग्रामसेवक श्री. सचिन सुर्यवंशी तसेच तलाठी श्री. रणजीत वाघ यांनी विशेष परिश्रम घेतले.
मळगांव (ना) येथिल उपनेते डॉ. अद्वयआबा हिरे-पाटील समर्थक कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
नवनिर्वाचीत सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचे शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. डॉ. अद्वयआबा हिरे-पाटील यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.