प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज
क.भा. हिरे शिक्षण संस्थेच्या टी. आर. हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,दाभाडी येथे महिला तक्रार निवारण व सखी सावित्री समिती अंतर्गत किशोरवयीन मुलींच्या सुरक्षा आणि समस्यांवरील उपाय योजना तसेच लैंगिक शोषण या विषयावर शिबिराचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री. एस. आर. निकम होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.ज्ञानेश्वरी डांगे, (दाभाडी ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक.)सौ संगीता चव्हाण (महिला आघाडी शिवसेना जिल्हाप्रमुख) श्रीमती मनीषा अहिरे (शिवसेना तालुकाप्रमुख) श्रीमती दीपिका फसाले,श्रीमती पुनम इंगळे (वैद्यकीय समन्वयक,दाभाडी ग्रामीण रुग्णालय)सौ. कल्याणी कदम,श्री परमदीप बागुल (अश्वपती ढोल-ताशा पथक, मालेगाव.) उपस्थित होते.
१२ ते १४ या वयोगटात मुलींचा शारिरीक, मानसिक आणि भावनिक विकास होत असतो. त्यामुळे या वयातील मुलींना समजावून सांगणं, त्यांच्यावर चांगले संस्कार करणं गरजेचं असतं. किशोरवयीन मुलींना दैनंदिन जीवनात येणाऱ्या विविध समस्यां व त्यावरील उपाय योजना, लैंगिक समस्या इत्यादी विषयांच्या अनुषंगाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.प्रमुख मान्यवरांकडून सॅनिटरी पॅड मशीन आणि डिस्पोज मशीन विद्यालयास भेट म्हणून देण्यात आले. विद्यालयात स्थापन करण्यात आलेल्या सखी रूमचे उद्घाटन मान्यवरांकडून करण्यात आले.
प्रमुख वक्त्या म्हणून विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती एस.डी.बच्छाव मॅडम यांनी किशोरवयीन मुलींमध्ये होणारे शारीरिक मानसिक व भावनिक बदलाविषयी सविस्तर माहिती दिली. स्वयंरक्षणासाठी गुड टच व बॅड टच याच्यातील फरक समजावून सांगताना चित्रफीत चा वापर करण्यात आला. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाची उद्धारि. अशा या नारीशक्तीला समाजात मानाचे स्थान मिळालेच पाहिजे याकरिता.स्रियांनी स्वावलंबी,आत्मनिर्भर व उच्चशिक्षित होऊन देशहिताला हातभार लावला पाहिजे.स्रिया ह्या अबला न राहता सबला होऊन समाजकंटकांचा व नराधमांचा तबला वाजवल्या शिवाय राहणार नाहीत.
आजच्या चिमुकल्या ह्या उद्याच्या भावी माता होणार आहेत. योग्य व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी विश्रांती, मन एकाग्र ठेवण्यासाठी प्राणायाम, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. वाईट विचार अपप्रवृत्ती यांपासून दूर राहिले पाहिजे.क्षणिक सुखाला बळी न पडता, सारासार विचार करून आपले वर्तन कुटुंबाला, समाजाला, शाळेला शोभेल असे असले पाहिजे. चारित्र्यसंपन्न व्यक्तीला समाजात मानाचे स्थान असते यामुळे आपल्या आई-वडिलांचे व शाळेचे नाव उज्वल होते... हे कायमस्वरूपी आपण लक्षात ठेवले पाहिजे.. अशा विविध विषयांवर मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीमती ए.बी. अहिरे मॅडम यांनी केले. तर कार्यक्रमाचे नियोजन प्राध्यापिका श्रीमती पी.बी. डांबरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षिका श्रीमती सविता सूर्यवंशी,अंकिता देसले,संगिता पाटिल,छाया पाटील, मनीषा पाटील , माया मगर, वैशाली सूर्यवंशी,धनश्री बोरसे यांनी परिश्रम घेतले.