प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज
विद्यार्थी कृती समिती व सुविचार मंच या संस्थेंच्या माध्यमातून गेल्या १३ वर्षांपासून “देव द्या, देवपण घ्या” हा उपक्रम राबविण्यात येतो. यंदाचे या उपक्रमाचे चौदावे वर्ष आहे. दरवर्षी नाशिककरांकडून संकलित केलेल्या हजारो गणेश मूर्ती नाशिक महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात येतात.
गणेशोत्सवातील १० दिवस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व घरोघरी जाऊन विद्यार्थी कृती समितीच्या कार्यकर्त्यांकडून पीओपीच्या गणेशमूर्ती नदीपात्रात विसर्जित न करता दान करावे अशी जनजागृती करणारी पत्रके वाटली जातात. नाशिकचे गोदाप्रेमी भाविक या आवाहनाला दरवर्षी भरभरून पाठिंबा देत आहेत. गेली १३ वर्षे सातत्याने हा उपक्रम राबविला जात असल्याने दिड, पाच व सात दिवसांच्या गणेशोत्सवातील मूर्ती देखील स्वीकारण्यात येतात.
दरवर्षा प्रमाणे यंदा देखील अनंत चतुर्दशीच्या दिवशी चोपडा लॉन्स जवळील गोदापार्क येथे सकाळी ९ ते २ या वेळेत “देव द्या, देवपण घ्या” उपक्रमाचे कार्यकर्ते मूर्ती स्विकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकाश पगार, विशाल गांगुर्डे, सागर बाविस्कर, वैष्णवी जोशी, राहुल मकवाना, सुजित सोनवणे, जयंत सोनवणे, रोहित कळमकर, कोमल कुरकुरे, सोनू जाधव, तुषार गायकवाड, ललित पिंगळे, कुणाल सानप, संकेत निमसे, भाग्यश्री जाधव, भावेश पवार, शुभम पगार, मदन म्हैसधुणे, योगेश निमसे, अविनाश बरबडे, सागर दरेकर, गौरी घाटोळ, जयश्री नंदवानी, प्रणाली शिंदे, श्रेया सोनवणे, गीतांजली पवार, स्मिता शिंदे, सिद्धार्थ दराडे, प्रसाद हिरे, वैभव बारहाते, महेश मंडाले, हर्षिता माळी, आदी परिश्रम घेत आहेत.