प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज
शल कामगार आणि मनुष्यबळाची उणीव भासत असल्याने नुकताच महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक करार केला असुन यासाठी कुशल कामगार आणि मनुष्यबळ महाराष्ट्र शासन पाठवणार आहे ज्यात त्यांचा जर्मन भाषेचा संपुर्ण प्रशिक्षनाचा खर्च शासन करणार आहे. यासाठी जी भाषा लागणारे तिच्यासाठी शिक्षण, प्रशिक्षण,शिक्षणासाठी इतर पूर्ततेसाठी एक लाख रुपये पर्यंत अनुदान देण्यात येईल.यामधे आपणांस बस, ट्रक, हलकी व अवजड वाहन चालक, लॅब टेक्निशियन, परिचारिका, वार्ड बॉय या क्षेत्रात नोकरी उपलब्ध होईल यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता व वयाची अट असणार आहे . बागलाण तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि भाजप जिल्हा उपाध्यक्ष राकेश घोडे मित्र मंडळाच्या माध्यमातून बागलाण तालुक्यातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महिन्याचे वेतन तीन लाखापर्यंत भारतीय चलनात असणार आहे. सदर न सुवर्णसंधीचा बागलाण तालुक्यातील ग्रॅज्युएट, बारावी पास, 10 वी अशा सर्व विद्यार्थ्यांनी पुढील भविष्यासाठी नोकरीच्या संधी अजून कुठे उपलब्ध असणारे आपण एमपीएससी ,आयपीएस, यूपीएससी विषयी सुद्धा मार्गदर्शन सदर नोकरी विषयक मेळाव्यात केले जाणार आहे .त्यासाठी बागलाण ॲकडमी येथे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव आणि त्यांची अधिकारी टीम व वैद्यकीय अधीक्षक बागलाण डॉ गाडेकर हे सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत परिवहन अधिकारी विनोद जाधव यांनी पुढील आवाहन केले आहे प्रबंधभूमी न्यूज चॅनल साठी निळकंठ भालेराव सटाणा प्रतिनिधी