प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज
आज सकाळपासून बस कर्मचारी संयुक्त कृती समिती तर्फे सकाळ पासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यात सटाणा आगारातील 450 कर्मचारी सहभागी झाले आहेत. पगार वाढ, महागाई भत्ता, 72 महिन्याच्या फरक, राज्य सरकारी कर्मचारी वेतन मिळणं बाबत तसेच इतर मागण्यासाठी आज सटाणा आगारातील कर्मचारी काम बंद आंदोलन सुरू केले. ज्यात सटाणा आगारातील 74 बसेसची चाक थांबली असून ज्यामुळे प्रवाशांचे, शालेय विद्यार्थी, विद्यार्थीनींनी, व इतर कर्मचारी यांचे अतोनात हाल होत आहेत, म्हणून प्रवाशांनी खाजगी वाहतूकीचा पर्याय निवडला आहे.
प्रबंधभूमी न्यूज साठी निळकंठ भालेराव सटाणा प्रतिनिधी