प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज
*नाशिक, दि. 2 सप्टेंबर, 2024 (जिमाका वृत्तसेवा)* : राज्य शासनाद्वारे स्थापित मुलींच्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, नाशिक येथे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने अशासकीय पदे महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळामार्फत भरण्यात येणार आहेत. त्यासाठी गुरुवार ५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता मुलाखतीसाठी मुलींची सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, सैनिकी मुलांचे वसतिगृह, पत्रकार कॉलनी, त्र्यंबक रोड, शासकीय डेअरीसमोर उपस्थित राहावे, असे आवाहन संचालक मेजर एस. फिरासत (निवृत्त) यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.
भरावयाच्या पदांची माहिती अशी (अनुक्रमे पदनाम, पद संख्या, पात्रता, शेरा या क्रमाने) : लिपिक नि टंकलेखक, १, पदवी, पदव्युत्तर, माजी सैनिक व सैन्यातील लिपिक कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य. भांडारपाल, १, पदवी, पदव्युत्तर, माजी सैनिक, सैन्य दलातील भांडारपाल पदाचा अनुभव असल्यास प्राधान्य. पहारेकरी, २, दहावी उत्तीर्ण, पहारेकरी पदाचा अनुभव असल्यास प्राधान्य. स्वयंपाकी (महिला), १, मसालची (महिला), स्वयंपाक येत असल्यास, स्वयंपाक गृहात काम करण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य. ग्राऊंडसमन, १, दहावी उत्तीर्ण, खेळाच्या मैदानाची देखभाल व दुरुस्ती करण्याच्या कामाचा अनुभव.
जिल्ह्यातील इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपल्या संबंधित पदाचा अर्ज व कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक ७८७५८-१७७६९, ८८८८७- ९८५८४ यांच्यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
०००००