दिनांक : 31 ऑगस्ट, 2024
प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज
मालेगांव तालुक्यातील महाविकास आघाडीच्या ग्रामपंचायतींच्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी मालेगांव येथे शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते मा.डॉ. अद्वयआबा हिरे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 'सरपंच परिषद' आयोजीत करण्यात आली आहे. या सरपंच परिषदेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन धुळे लोकसभेच्या खासदार मा. डॉ. शोभाताई बच्छाव व दिंडोरी लोकसभेचे खासदार श्री. भास्कर भगरे सर उपस्थित राहणार असल्याची माहिती श्री. शरद खैरनार, तालुकाध्यक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, श्री. संदिप पवार, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) व श्री. रामभाऊ मिस्तरी, तालुकाप्रमुख शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
मंगळवार, दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी नामपुर रोडवरील साई सेलीब्रेशन हॉल येथे सकाळी 11.00 वा. आयोजीत करण्यात आलेल्या सरपंच परिषदेस प्रमुख अतिथी म्हणुन सर्वश्री कोंडाजीमामा आव्हाड, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार), मा. आ. शिरिषभाऊ कोतवाल, जिल्हाध्यक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, श्री. गणेशभाऊ धात्रक, जिल्हा प्रमुख, शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, श्री. जयंतजी दिंडे, लोकसभा संपर्क प्रमुख, शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, श्री. राजेंद्रभैय्या भोसले, मा. चेअरमन, मामको बँक, श्री. प्रसादबापू हिरे, मा. सभापती, कृऊबा मालेगांव, मा.शान-ए-हिंद निहाल अहमद, महानगर प्रमुख, समाजवादी पार्टी, मा. एजाज बेग, महानगर जिल्हाध्यक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, श्री. राजाराम जाधव, महानगर जिल्हाप्रमुख, शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, श्री. विनोद चव्हाण, उपसभापती, कृऊबा मालेगांव, श्री. प्रसाद (लकीदादा) खैरनार व्हा. चेअरमन, श्री. व्यंकटेश को-ऑप. बँक मालेगांव, श्री. प्रविण हिरे, प्रेसिडेंट, शेतकरी सहकारी संघ, मालेगांव उपस्थित राहणार आहेत.
मालेगांव तालुक्यातील महाविकास आघाडीच्या सर्व सरपंच व उपसरपंच यांनी या 'सरपंच परिषदेस' उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.