मालेगाव

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरण, क्रांति ज्योती सावित्रीबाई फुले संग्रहालय व महिला अभ्यासिका आणि महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा लोकार्पण सोहळा अभूतपूर्व उत्साहात संपन्न.*


प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज

मनपा वृत्त सेवा:- आज दिनांक २९/०८/२०२४ रोजी संध्याकाळी ६ ते ७.३० दरम्यान या तिन्ही वास्तूंचे आणि नव्यानेच तयार झालेल्या मोसमपूलच्या एका मार्गिकेचे लोकार्पण मा.ना.दादाजी भुसे, पालकमंत्री नाशिक यांचे हस्ते आणि आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल आणि मा.आयुक्त तथा प्रशासक रविंद्र जाधव यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला.
सर्वप्रथम मोसम पूल मार्गिका नंतर शिवतीर्थ परिसर सुशोभीकरण त्यानंतर क्रांति ज्योती सावित्रीआई फुले संग्रहालय व महिला अभ्यासिका आणि सर्वात शेवटी महामानव,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळा लोकार्पण सोहळा पार पडला.या सर्व कार्यक्रमांना स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी करून या सर्व सुवर्णक्षणाचे साक्षीदार झालेत. त्यांचा अभुतपुर्व उत्साह ओसंडून वाहत होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा कार्यक्रमासाठी देशाच्या विविध भागातून आलेले भन्तेजी यांनी धार्मिक उद्घोषात या कार्यक्रम पार पाडला.
यावेळी समुदयास संबोधन करतांना मा.ना.दादाजी भुसे म्हणाले की, आज खऱ्या अर्थाने मालेगाव करांच्या तीन पिढ्यांचे स्वप्न पुर्ण होत आहे. यासाठी मा.मुख्यमंत्री ना.एकनाथ जी साहेब यांचे आभार मानतो त्यांनी या तिन्ही वास्तू आणि विकासकामांसाठी मालेगाव करांना मालेगाव महानगरपालिकेच्या माध्यमातून भरघोस निधी उपलब्ध करून दिला. आता मालेगावकरांची जबाबदारी आहे की, या सर्व वास्तूंचे पावित्र जपुन एकात्मतेचे दर्शन घडवावे. मालेगाव करांसाठी आज भाग्याचा दिवस असुन एकाच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरण, क्रांति ज्योती सवित्रीआई फुले संग्रहालय व महिला अभ्यासिका आणि तीस वर्षांपासून प्रतिक्षित महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा या सर्व महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशाला दिशा देणाऱ्या महामानवांचा वास्तू आज लोकार्पण होत आहे. 
या कार्यक्रमास माजी उपमहापौर निलेश आहेर, अतिरिक्त आयुक्त नुतन खाडे, उपायुक्त गणेश शिंदे, सर्व पक्षीय नेते सुरेश नाना निकम, हरिप्रसाद गुप्ता, मनोहर बापु बच्छाव, विनोद वाघ,प्रमोद शुक्ला, कैलास तिसगे, भिमा भडांगे, राजेश गंगावणे, भारत चव्हाण, भारत जगताप, भारत म्हसदे, कैलास तिसगे, रविंद्र निकम, दीपक निकम, जितेंद्र आबा पाटील, मनपा सहा.आयुक्त नेहा कंठे, अनिल पारखे, मुख्य अग्निशमन अधिकारी डॉ.संजय पवार, लेखापरीक्षक शेखर वैद्य, जनसंपर्क अधिकारी पंकज सोनवणे, प्रभाग अधिकारी सचिन भामरे, मो.इरफान मो.अश्रफ यांचे सह अगणित शिवप्रेमी नागरिक, फुले प्रेमी जनता आणि आंबेडकरवादी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी त्यांच्या उत्साहाने सोहळा भव्यदिव्य झाला. या तिनही ठिकाणी जल्लोषात आतिषबाजी ने सोहळा लक्षणीय ठरला.
उपस्थित सर्वांचे आभार मा.ना.दादाजी भुसे यांनी मानले.
0000000

Related News