मालेगाव

एज्युकेअर इंग्लिश मिडीयम स्कूल सोयगाव येथे स्कॉलरशिप परीक्षेत लाभार्थी व विशेष प्राविण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांचा व त्याच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.

प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज 

 

 त्यानिमित्ताने शाळेतील स्कॉलरशिप परीक्षेत लाभार्थी विद्यार्थी सूरज रवींद्र जाधव शहरी विभागातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याने त्याच्या आई व वडिलांचा शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली जैन यांच्या हस्ते करण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत सहभाग घेऊन यश संपादन करावे, हे जग स्पर्धेचे आहे असा संदेश विद्यार्थ्यांना दिला. शाळेच्या अध्यक्षा शिल्पा देशमुख यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे तसेच प्राविण्य मिळालेल्या सुरज जाधव चे कौतुक केले व शुभेच्छाही दिल्या. सदर कार्यक्रमासाठी पूनम जैन, गीतांजली निकम, आशा हिरे, रुपाली देसले, नीलिमा वाघ, शुभांगी शुक्ला, मयुरी गुंजाळ, नेहा गायकवाड, स्वेता सरक, भाग्यश्री अहिरराव, सविता बच्छाव, ऋतुजा खैरनार, शरद लोखणे, तुषार अहिरे, साजिद खान, धीरज अहिरे, कल्पेश अहिरे, चेतन निकम, प्रतीक्षा शिंदे, रत्ना सूर्यवंशी उपस्थित होते.

Related News