मालेगाव

कायदे विषयक जनजागृती अभियान संपन्न*

प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज 

मालेगाव : मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सोयगावचे विद्यार्थी विकास मंडळ आणि मालेगाव तालुका विधी समिती, वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमध्ये अँटी रॅगिंग कायदेविषयक माहिती व्हावी यासाठी कायदे विषयक जनजागृती अभियान गुरुवारी ( ता. २२) संपन्न झाले.
यावेळी सदर अभियानासाठी वक्ते म्हणून मालेगाव सत्र न्यायालयाचे वरिष्ठ न्यायधीश एस. व्ही. पिंपळे,न्यायधीश एम. पी. परदेशी,ऍड. चंद्रशेखर देवरे  तर अध्यक्ष म्हणून मालेगाव तालुका संचालक ऍड. आर. के. बच्छाव आणि मंचकावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. क्षीरसागर, ऍड. आर. डी. निकम, खैरनार हे उपस्थित होते.
यावेळी बोलताना न्यायधीश एस. व्ही. पिंपळे म्हणाले की, वरिष्ठ विद्यार्थ्यांनी नव्या विद्यार्थ्यांचे नक्की स्वागत करा, त्यांना आपल्या सिनिअर विषयी विश्वास वाटलं पाहिजे. पाहिजे ते जीवघेणे नसावं. अन्यथा आपल्या करिअर बरबाद व्हायला वेळ लागत 
नाही.
परदेशी यांनी अँटी रॅगिंग कायद्याची स्थापना, त्यातील कलमे, शिक्षेची तरतूद आणि भविष्यावरील परिणाम यावर आपले मत व्यक्त केले.
अध्यक्षक्षीय समारोप करताना ऍड. आर. के. बच्छाव म्हणाले की, या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा हेतू विद्यार्थ्यांमध्ये कायदे विषयक जनजागृती व्हावी हा होता.ते शेवटी म्हणाले की, आपल्या महाविद्यालयाच्या दालनात कायदेविषयक सर्टिफिकेट कोर्स सुरु करता येईल असे आश्वासित केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर त्रिभुवन यांनी केले तर आभार प्रदर्शन उप प्राचार्य र्डॉ. एम. व्ही. जगताप यांनी मांडले.

Related News