सटाणा

दोन बिबटयाच्या हल्यात मुळाने - वस्तीत पण शिरकाव

 प्रबंधभूमी न्यूज साठी निळकंठ भालेराव सटाणा प्रतिनिधी                                           
  सटाणा -  कारभारी गंगाराम कांदळकर राहणार मुळाने दोदेश्वर रोड यांच्या शेतामध्ये काल रात्री साडेदहा वाजता दोन बिबटे नी हल्ला केल्याने जवळजवळ नऊ मेंढ्यांचे नुकसान झालेले आहे . मुळाने दोदेश्वर वनपरिक्षेत्रात रानडुकरांचे प्रमाण वाढले आहे तसेच लांडगे ससे ,मोर ,बिबट त्यांची संख्या देखील वाढली आहे परंतु त्यांना योग्य अशी शिकार न मिळाल्याने नागरी वसाहतीकडे त्यांची धाव वाढत आहे. त्यामुळे वनालगत असलेले दोदेश्वर, कोळी पाडा ,करे ,चौगाव ,भाक्षी मुळाने, कौतिक पाडे, आवाटी, वनोली येथील शेतकऱ्यांनी योग्य अशी काळजी घेणे गरजेचे आहे. त्या 3 मोठ्या आणि बाकीचे छोटे कोकरू असे एकूण नऊ जनावरांवर हल्ला करून नुकसान झालेला आहे. तरी सदर घटना ही वन विभागाचे बोडके मॅडम तसेच वन अधिकारी सटाणा वनपरिक्षेत्र प्रशांत खैरनार यांना माहिती देण्यात आली असून लवकरच त्यांनी पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यास नुकसान भरपाई शासनाकडून देण्यासाठी योग्य ती कारवाई करून प्रकरण सादर केले आहे, त्याबद्दल मुळाने वन कमिटी तर्फे व अध्यक्ष राकेश पांडुरंग घोडे  निसर्ग आणि प्राणी मित्र वन कमिटी मुळाने, तानाजी निकम सरपंच ,पोलीस पाटील संदीप हालिज तर्फे त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.

 

Related News