प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज
अत्याचार झाल्याच्या घटनेचे सटाणा येथे तीव्र पडसाद उमटले असून राज्य महिला आयोगाच्या सदस्या व बागलाणच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संतप्त महिला व युवतींनी बागलाण तहसील कार्यालयासमोर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत धरणे आंदोलन छेडले. सरकारने महिला, विद्यार्थीनी व लहान मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांवर फास्ट ट्रॅक खटला चालवावा व अशा नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणीही यावेळी संतप्त महिलांनी आली.
माजी आमदार दीपिका चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संतप्त महिला व युवती घोषणाबाजी करीत तहसील कार्यालयात दाखल झाल्या. ‘माझ्या चिमुरडीला न्याय मिळालाच पाहिजे’, ‘साहेब एक वेळ आम्हाला लाडकी बहीण योजना नसली तरी चालेल पण राज्यात सुरक्षित बहिण योजना पाहिजे’, ‘आग लावा तुमच्या योजनेला जिथे सुरक्षा नाही आमच्या बहिणीला’ असा विविध घोषणांमुळे तहसील परिसर दणाणून गेला होता. यावेळी बोलताना माजी आमदार दीपिका चव्हाण म्हणाल्या, या निंदनीय घटनेमुळे राज्यातील लहान मुली, विद्यार्थीनी व महिला भगिनींमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. महात्मा फुले, राजर्षी शाहु महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारसरणीचा वारसा चालविणाऱ्या महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. हे प्रकार महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याला काळीमा फासायला लावणारे आहे. अशा घटना भविष्यकाळात घडू नये यासाठी कडक कायदे व्हावेत. गुन्हेगारांना जरब बसावी यासाठी पोलिस प्रशासनाने कायद्याचा धाक निर्माण करणे गरजेचे आहे. महिलांवरील अत्याचारात देशात व राज्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. कोलकाता येथील आर.जी.मेडीकल कॉलेजमध्ये प्रशिक्षीत डॉक्टर युवतीवर झालेल्या सामुहिक बलात्कार व अत्याचाराचे प्रकरण ताजे असतानाच राज्यातील महायुती सरकारने महिला, विद्यार्थीनी व लहान मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांवर फास्ट ट्रॅक खटला चालवावा आणि अशा नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी.
यावेळी बोलताना शिवसेना उबाठा गटाचे जिल्हा संघटक लालचंद सोनवणे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्वात नाकर्ते गृहमंत्री असून राज्यात अशा घटना पुन्हा वारंवार होत असताना त्यांना थांबवण्यासाठी ते निष्क्रिय ठरत आहेत. त्यामुळे गृहमंत्र्यांनी तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली. यानंतर तहसिलदार कैलास चावडे यांना निवेदन देण्यात आले.
आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष केशव मांडवडे, शिवसेनेचे जिल्हा संघटक लालचंद सोनवणे, महिला तालुकाध्यक्षा उषा भामरे, जिल्हा उपाध्यक्षा वंदना भामरे, शमा दंडगव्हाळ, सुरेखा बच्छाव, ज्योती खैरनार, तालुका कार्याध्यक्ष संजय पवार, वुमन राईट तालुकाध्यक्ष व पोलीस मित्र सदस्या वैशाली म्हसदे, दिव्यांग ज्योती भामरे, योगिता शिंदे, स्वाती गरकल, चांदाबाई गरकल, मीना भामरे, कल्याणी शिरसाठ, माधुरी दळवी, आशा बच्छाव, राजश्री राजपूत, माधुरी वाघ आदींसह शेकडो महिला व युवती सहभागी होत्या.