सटाणा

अंतापुर ता. ११: ताहाराबाद( ता. बागलाण) येथील मोसमनदी पुलाचे काम दुरुस्त होत नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे

प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज
याबाबत भाजपा किसान मोर्चा प्रदेश महामंत्री बिंदू शेठ शर्मा व परिसरातील ग्रामस्थांनी काही काळ पुलावर रस्ता रोको केला असून   जिल्हाधिकारी जलज शर्मा साहेब यांना येथील गंभीर  परिस्थितीची जाणीव करून दिली  असता तातडीने रहदारी सुरू करावी अशी मागणी केली आहे.
 
विंचूर- प्रकाशाराज्य मार्गावरील व गुजरात- महाराष्ट्र सरहद्दी वरील ताहाराबाद येथील मोसमनदी वरील जुन्या पुलाचे काम गेल्या तीन महिन्यापासून संत गतीने चालू आहे. संबंधित विभागाने पिंपळनेर ते सटाणा या रस्त्याच्या रुंदीकरण, काँक्रिटीकरण कामासाठी कोट्यवधी रुपये निधी खर्च करण्यात आला आहे. परंतु सदर रस्त्यादरम्यान संबंधित विभागाने अद्याप पर्यायी पुलाचे काम सुरू न केल्याने कमकुवत पुलावरूनच तीन महिन्यापूर्वी रहदारी सुरू होती. अपघात होऊ नये यासाठी संबंधित विभागाने ताहाराबाद व अंतापुर येथील  पुलांवरून जड वाहतूक बंद केली आहे. परंतु सदर ठेकेदार निष्काळजीपणे मंद गतीने काम करत असल्याने  प्रवासी,जड वाहतूक नामपुर ,साक्री मार्गाने वळविण्यात आली असून सदर पुलावरून फक्त लहान वाहनांना परवानगी देण्यात आले आहे. प्रवासी वाहतूक व इतर शेतकरी बांधवांचे शेतीमाल विकणारे जड वाहन बंद असल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होऊन प्रवासी, शालेय विद्यार्थी, रुग्ण व इतर नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. 
आमदार दिलीप बोरसे यांनी महिनाभरापूर्वी संबंधित ठेकेदारास दहा दिवसाचा अल्टिमेट दिला होता व त्यानंतर पालकमंत्री दादाजी भुसे आले असता यांनाही ग्रामस्थांनी लेखी निवेदन देऊन  प्रवासी व जडवाहू या पुलावरून लवकर चालू व्हावी अशी मागणी केली होती. परंतु संबंधित ठेकेदार हे फक्त मुख्य दुरुस्तीचे कामास कमी महत्त्व देऊन रंगरंगोटी करत आहेत. 
सदर पुलामुळे गैरसोय होत असल्याने संबंधित विभागाच्या निषेधार्थ मोबाईल व्हाट्सअप ला  वेगवेगळ्या चित्रफिती, फोटो तयार करून निषेध व्यक्त करण्यात येत आहेत. सध्या मोसम नदीला पाणी असल्याने ताहाराबाद कठगड गावातून जाणारा पर्यायी रस्ता ही खराब झाला आहे.  पिसोळबारी येथेही चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात झाला आहे. संबंधित लोकप्रतिनिधी , अधिकारी  यांनी गंभीर बाब लक्षात घेता तातडीने सदर पुलावरून जड व प्रवासी वाहतूक चालू करावी अशी मागणी महामंत्री बिंदूशेठ शर्मा यांच्यासह सोसायटी सभापती के. पी. जाधव, बाजार समितीचे संचालक संदीप निकम,  दिलीप भामरे, संजय सूर्यवंशी, निवृत्ती सोनवणे,  हेमंत साळवे, राजू मानकर, गजानन साळवे, अविनाश खन्ना,  अमोल जाधव,किरण पवार , विक्की सोनवणे, वैशाली गांगुर्डे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे. 

फोटो- ताहाराबाद येथील  पुलाची दुरुस्ती लवकर व्हावी यासाठी रास्ता रोको करताना   भाजपा किसान मोर्चा महामंत्री बिंदूशेठ शर्मा सोबत दिलीप भामरे, संजय सूर्यवंशी, निवृत्ती सोनवणे ,राजू मानकर, भैया भामरे. 

( ताहाराबाद  पुल परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकरी विविध शेत मालाचे उत्पन्न घेऊन करंजाड, ढोलबारे, सटाणा ,नामपुर नाशिक धुळे जिल्ह्यासह गुजरात व इतर राज्यात    शेतीमाल विक्रीसाठी व  अनेक शाळा, कॉलेज, द्वारकाधीश साखर कारखाना, मांगीतुंगी व साल्हेर -मुल्हेर पर्यटन स्थळ असल्याने सदर पुलाच्या गैरसोयीमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Related News