प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज
महिला व बाल कल्याण समिती नाशिक मार्फत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयांतर्गत बालगृहामध्ये काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालके दाखल केली जातात. सदर बालकांची ओळख पटवून संपर्क साधाण्याचे आवाहन, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनिल दुसाणे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
*असा आहे बालकांचा तपशिल*
➡️ कुमारी वैदही, वय 4 दिवस ही बालिका 27 जुलै 2024 रोजी पंचवटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सकाळी 7.30 वाजेपूर्वी मेरी पाटाजवळ, आनंदवन रो हाऊसजवळ, लामखेडे मळा, पंचवटी, नाशिक येथे सदर बालिका विनापालक आढळून आली असून बालिकेच्या पालकांचा शोध पोलीसांनी घेतला असता कुणीही मिळून न आल्याने बालिकेस 31 जुलै, 2024 रोजी बाल कल्याण समितीच्या आदेशान्वये बालिकेस वैदही नाव देवून आधाराश्रम, घारपुरे घाट, नाशिक संस्थेत दाखल केले आहे.
➡️ कुमारी माही अनिल उर्फ मयुरी, वय 8 वर्ष ही बालिका 10 जुलै 2023 रोजी मनमाड पोलीस स्टेशनच्या हद्दीत विनापालक आढळून आली असून बालिकेच्या पालकांचा शोध पोलीसांनी घेतला असता कुणीही मिळून न आल्याने बालिकेस बाल कल्याण समितीच्या आदेशान्वये बालिकेस आधाराश्रम, घारपुरे घाट, नाशिक संस्थेत दाखल केले आहे.
या दोन बालकांच्या भविष्याचा विचार करता कुमारी वैदही व कुमारी माही उर्फ मयुरी याच्या पालकांनी आधाराश्रम संस्था, घारपुरे घाट, नाशिक येथे 0253-2580309, 2950309 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष नाशिक, समाज कल्याण आवार, नाशिक पुणे रोड, नासर्डी पुलाजवळ, नाशिक 0253- 2236368 या ठिकाणी संपर्क साधावा.
माहिती प्रसारणाच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत बालकांचा दावा करण्यास कोणी आले नाही तर बालकांना पालक नसल्याचे गृहीत धरून पुढील पुनर्वसनाचा विचार करण्यात येणार असल्याचेही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनिल दुसाणे यांनी कळविले आहे.
0000000