प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज
विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिक यांचे कार्यालयातील बॅटरी आधारीत सोलर प्लँट बसविण्यात आला आहे. या सोलर सिटीम बॅटरी व इर्न्व्हटरच्या वार्षिक देखभाल करारासाठी इच्छुकांनी दरपत्रके 29 ऑगस्टपूर्वी कार्यालयीन वेळेत विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक रोड (अभिलेख कक्ष) येथे सादर करावीत, असे उपाआयुक्त (सा. प्र.) मंजिरी मनोलकर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
सोलर सिस्टीमसाठी वार्षिक देखभाल नियोजनबध्द करण्यात यावे, देखभाल कार्यालयाच्या सुट्टयांचे दिवशी करावे लागेल, देखभाल करतांना योग्य ती काळजी घेण्यात यावी, कुठल्याही प्रकारे सोलर सिस्टीमला हानी पोहोचणार नाही, याची खबरदारी घेण्यात यावी. या अनुषंगाने इच्छुक पुरवठादार यांनी नमुद अटी व शर्तीच्या अधिन राहून आपली दरपत्रके विहीत मुदतीत कार्यालयात सादर करावीत, अशी माहिती उपाआयुक्त (सा. प्र.) मंजिरी मनोलकर यांनी दिली आहे.
0000000