सटाणा

एसटीचे चाके लोहोणेर बस थांब्यार न थांबल्याने मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणसह, विद्यार्थ्यी, प्रवाशांची गैरसोय*

सोपान सोनवणे प्रबंभूमी महाराष्ट्र न्युज लोहोणेर 

लोहोणेर बस थांब्यावर एसटी ची चाके न थांबल्याने मोठ्याप्रमाणात प्रवशांचे गैरसोय होत असुन चालक आपल्या बेशिस्त, मनमर्जी पणाने प्रवाशांना न घेता निघून जात आहेत तर कधी बस थांब्यावर न थांबता गांवालगत पुला जवळ प्रवाशांना सोडून निघून जातात. बाहेर गांवी जाणारे प्रवाशी, नोकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी हे एसटी ची वाट पहात ताटकळत थांब्यावर थांबून असतात तर महिला सन्मान योजनेतून बसमध्ये तिकिटात ५० टक्के सवलत आणि रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांचे मिळून खात्यावर तीन हजार रुपये जमा झाल्याचा आनंद महिलांना झाला. मोठ्या खुशीत महिला भावाला राखी बांधण्यासाठी बसने माहेरी गेल्या. परंतु, आता परतीच्या प्रवासात बस थांब्यार थांबत नाही म्हणून गैरसोयीचा सामना मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना करावा लागत आहे.सटाणा आगारातुन येणारी एसटी बस थांब्यावर न थांबता पुढे निघून जाते तर प्रवाशांनी आणि मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीनी जायचं कशावर असा अनभिज्ञ प्रश्न बहिणीबह प्रवाशांना पडला आहे..
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले तर यास जबाबदार कोण त्यामुळे महामंडळाने कायमस्वरूपी एक कर्मचारी लोहोणेर येथील बस थांब्यावर ठेवून ज्या एसटी बसेस थांबत नाही अशा बेजबाबदार चालक, वहाकावर महामंडळा मार्फत काय कारवाई करण्यात आली पाहिजे असे प्रवाशांनी सांगितले.

*प्रतिक्रिया*

लोहोणेर येथे पुढील प्रवासासाठी थांबून असलेल्या प्रवाशांची गैरसोय होवू नये म्हणून सटाणा आगाराने जादा बससे सुरू कराव्यात :- *राकेश गुळेचा*

हात द्या आणि बस थांबवा ह्या घोषणेला चालकाकडुन केराची टोपलीत टाकले जात आहे का??
लोहोणेर येथे एसटी बसच्या चालकानी प्रवाशांना न घेता पुढे निघून गेल्यांस कुठलीही पुर्व सुचना न देता रस्तारोको करण्यात येईल आणि त्यांस जबाबदार महामंडळ असेल:- *गोकुळ आहिरे*

मनमानी कारभार करणाऱ्या चालकावर , कार्यवाही करावी अन्यथा रस्तारोको हा एकच मार्ग आमच्या कडे शिल्लक आहे .
*गोरख शेवाळे भाजपा उपतालुकाध्यक्ष देवळा*

Related News