निफाड

खेडे येथील हिंगलाज देवी मातेचा प्रगट दिन उत्साहात संपन्न --*

 

*दैनिक प्रबंधभुमी न्युज*
*निफाड रामभाऊ आवारे*

सालाबाद प्रमाणे निफाड तालुक्यात स्थित असलेल्या उगाव खेडे म्हणजेच हिंगलाज नगर मध्ये साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या हिंगलाज मातेचे अधिष्ठान हिंगलाज नगर येथे आहे श्रावण शुद्ध नारळी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी आईचा प्रगट दिन सोहळा दरवर्षी साजरा केला जातो. या ऐतिहासिक मंदिराची कहाणी सांगायची झाल्यास डोंगरपुरी महाराज एक तपस्वी संन्यासी होते ते आदिशक्तीचे स्मरण करण्यासाठी तसेच तिचे दर्शन घेण्यासाठी बलुचिस्तानांमध्ये स्थित असलेल्या हिंगलाज माता मंदिरामध्ये जात असत, परंतु काही कारणास्तव या डोंगरपुरी महाराजांना तिकडे जाणे शक्य नसल्याने त्यांनी मातेस विनंती केली की ,आई आपण मला रोज दर्शन द्यावे. यासाठी माझ्यासोबत चालावे तर संतांच्या या भक्ती वरती प्रसन्न होऊन मातेने त्यांच्यासोबत येण्याचे ठरवले परंतु तुम्ही जिथे मागे बघाल तिथे मी माझे निवासस्थानी स्वयंभू स्थान घेईल. असे या ठिकाणी सांगण्यात आले असताना डोंगरपुरी महाराज हे वाटेने निघाले असताना त्यांनी विनिता नदीला आलेला पूर बघून आईस मागे वळून बघितले तर हिंगलाज नगर येथे मातेने स्वयंभू स्थानक स्थापित केले तसेच विनता नदीच्या तिरावरती डोंगरपुरी महाराजांची समाधी देखील आहे. या आदिशक्तीचा सोहळा तसेच या शक्तिपिठाचा जागर आणि जागृत देवस्थानांपैकी एक म्हणून केला जातो. तसेच देवी ही कुमारी का अवस्थेत असून साळी ,माळी ,तेली ,गुजराती ,मारवाडी असे अठरापगड जातींची आईसाहेब कुलदैवत आहे. या देवीचा भव्य दिव्य असा प्रगट दिन सोहळा रविवार रोजी संपन्न झाला. सकाळी सात वाजता मातेची महापूजा, सकाळी दहा वाजता ह भ प शुभम महाराज पानगव्हाणे  उगाव यांच्या सुमधुर कीर्तनाचा कार्यक्रम तसेच मातेचा प्रगट दिन व महाआरती सोहळा तसेच महाप्रसादाचे देखील आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते. या सोहळ्याचे आयोजन हिंगलाज देवी माता मंदिर संस्थान खेडे ट्रस्टच्या वतीने करण्यात आले असून हा सोहळा अगदी दिमाखदार रूपामध्ये संपन्न झाला.

Related News