प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज
सटाणा :- अहिरेश्वर मेडिकल एज्युकेशन रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन संचलित साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लखमापूर येथे काल (गुरुवार) मोठ्या उत्साहात व दिमाखात १५ ऑगस्ट साजरा करण्यात आला. शाळेत देशाबद्दल प्रेम, आत्मियता, शहिदांच्या आठवणी, वीरांना वंदन, विद्यार्थांचे कर्तव्य तसेच सामाजिक बांधलिकीची जाण करुन देणारा १५ ऑगस्ट साजरा करण्यात आला.इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थांनी सुरेख व सामाजिक संदेश देत भाषणाच्या माध्यमातून आपले विचार मांडले. इयत्ता पहिलीतील चिमुकल्यांच्या भाषणांनी स्वातंत्र्यदिन कार्यक्रमाची रंगत वाढवली. तसेच भारतमाता, राजमाता जिजाऊ,छत्रपती शिवाजी महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाष चंद्र बोस,राणी लक्ष्मीबाई ,महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, लोकमान्य टिळक,भगतसिंग, इंदिरा गांधी यांच्यासह विविध थोर समासुधारक यांच्या भूमिकेत चिमुकले आलेले होते विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत तसेच नृत्य सादर केले उच्च प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी भारतीय स्वतंत्र जवानांच्या प्रशिक्षणाच्या आधारावर मनोरा सादर केल्यानंतर सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अँड आहिरे यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या व बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचे स्मरण करून आपल्या देशाची प्रतिमा उंचाविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने काम करायला हवे या अनुषंगाने स्वच्छता व आरोग्य यांचा परस्पर संबंध असून ज्याप्रमाणे आपण आपले घर स्वच्छ ठेवतो त्याप्रमाणे आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची मानसिकता व जागरूकता वाढविण्यासाठी यापुढील काळात अधिक भर दिला जावा असल्याचे सांगितले.स्वातंत्र्यदिनी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बागलाण सैनिक संघाचे माजी सैनिक तसेच लखमापूर व परिसरातील मान्यवर, पालक, नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका रोशनी आहिरे, उपप्राचार्या सोनल हरपळे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी खूप मेहनत घेतली.