कळवण

कळवण नगरपंचायतीच्या नूतन इमारतीचे शुक्रवारी लोकार्पण; उपमुख्यमंत्री अजित पवारांसह मान्यवरांची उपस्थिती


प्रबंधभूमी महाराष्ट्र न्युज
कळवण : शहराची पालकसंस्था असलेल्या कळवण नगरपंचायतीच्या अद्ययावत सुसज्ज नूतन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते शुक्रवार दिनांक २ जुलै रोजी संपन्न होत असल्याची माहिती कळवणचे नगराध्यक्ष कौतिक महाराज पगार यांनी दिली आहे.
ग्रामपालिकेतून  नगरपंचायतीमध्ये रुपांतरित झालेल्या कळवण नगरपंचायतीची अद्ययावत प्रशासकीय इमारत गांधी चौकात साकारली असून या इमारतीचे काम पूर्ण होत आले आहे. ही वास्तू अद्ययावत व सर्व सोयीयुक्त असून, या कॉर्पोरेट लुक असलेल्या नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितिन पवार असणार आहेत. कार्यक्रमास राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ,पालकमंत्री दादाजी भुसे,महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे,विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन नगराध्यक्ष कौतिक महाराज पगार यांनी केले आहे. दरम्यान,कॉर्पोरेट लुक असलेल्या नगरपंचायतीच्या नूतन इमारतीचे वैशिष्ट्ये काय आहेत याबद्दल मुख्याधिकारी नागेश येवले यांनी माहिती दिली

Related News