युवराज वाघ, प्रबंधभूमी न्युज
कळवण : मानुर येथील जे डी पवार फार्मसी कॉलेज येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी रक्तदान शिबिरात तब्बल १११ विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. यावेळी कॉलेजचे संचालक, पदाधिकारी, शिक्षक, ग्रामपंचायत पदाधिकारी आजी - माजी पदाधिकारी तसेच मेट्रो रक्तपेटी सिविल हॉस्पिटल नाशिक येथील डॉ.अहिल्या दडस, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी अनिल मोरे , कापसे, ज्योती विंचाळ व उपजिल्हा रुग्णालय कळवण वैद्यकीय अधीक्षक डॉ शेख, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी प्रतिभा ठाकरे यावेळी उपस्थित होते.