प्रबंधभुमी न्युज
निफाड प्रतिनिधी रामभाऊ आवारे
लासलगाव ग्रामीण रुग्णालय अत्यंत दुरावस्थेतत आशिया खंडातील सगळ्यात मोठी कांदा बाजारपेठ लासलगाव असून पंचक्रोशीतील छोटी मोठी बरीच गाव यांचा लासलगाव शी संपर्क येतो आरोग्याच्या सुविधा परिपूर्ण असावा. याकरिता लासलगाव ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी बांधण्यात आलेले आहे. परंतु बऱ्याच त्रुटी व आरोग्याच्या असुविधा या ठिकाणी आढळून आल्यामुळे लासलगाव शहर विकास समितीच्या वतीने ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला. सदरील रुग्णालयात निवासी डॉक्टर नाहीत, नवजात शिशूंसाठी इनक्यूबेटर नाही, सोनोग्राफी एक्स-रे मशीन ची सोय नाही, रक्त तपासणीचे रिपोर्ट चार ते आठ दिवस झाले तरी मिळत नाहीत, निवासी डॉक्टर नसल्यामुळे रात्रीच्या वेळेस रुग्णांना भरती करून घेतले जात नाही, परिचारिकांकडून महिलांची डिलेव्हरी केली जाते पोस्टमार्टम रूम असूनही सुरू नाही रुग्णांना नाशिकला उपचारासाठी पाठवले जाते. कर्मचारी स्टाफ रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी अतिशय अरे रावी च्या भाषेमध्ये भाष्य करतात. या अशा एक ना अनेक तक्रारी लासलगाव शहर विकास समितीकडे आल्याने आज त्या ठिकाणी विकास समितीच्या माध्यमातून भेट देऊन ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला. तात्काळ या ठिकाणी जिल्हा चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे यांनी भेट दिली. यावेळी डॉ बाळकृष्ण आहिरे, डॉ आनंद पवार यांच्यासमवेत विकास समितीशी चर्चा करून सदरील सर्व प्रश्न तात्काळ आठ दिवसांमध्ये मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिले. विकास समितीच्या वतीने सदरील आश्वासनाची पूर्तता न झाल्यास आठ दिवसात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. ग्रामविकास समितीच्या वतीने प्रकाश पाटील, राजू कराड ,संदीप उगले ,स्मिता कुलकर्णी, फरीदा काजी, सचिन होळकर, फिरोज मोमीन, शहजाद पठाण, मिरान पठाण ,दुर्गेश गरुड ,नामदेव शिंदे, अर्षद शेख, युनूस पठाण, शोएब पठाण, माया होळकर, कविता चव्हाण, संतोष पानगव्हाणे, रमेश घोडके, अमर पठाण, सोहेल पठाण, जाकिर तांबोळी, मोनू मणियार, निहाल तांबोळी, सुफियान शेख ,कमलाकर उगले ,दत्तात्रय करपे, मधुकर उगले, फिरोज मोमीन, ज्ञानदेव शिंदे ,सलमान पठाण ,अझर पठाण, सुफियान बागवान, गणि तांबोळी, हरिहर इरफान ,शेख सोनू शेख व काही रुग्ण उपस्थित होते.