सुनिल बेलदार, प्रतिनिधी नाशिक
नाशिक दि १८ : आज आषाढी एकादशी निमित्त अवघे पंढरपूर दुमदुमले आहे. लाखोच्या संख्येने वारकरी हे पंढरपूर येथे दाखल झाले आहेत. आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची पत्नी यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. पंढरपुरात वैष्णवांचा भीमकाय महासागर लोटला आहे. जागो जागी वारकरी विठ्ठलाची आराधना करतांना दिसत आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांचे संकट दूर कर. चांगला पाऊस पडू दे. शेतकऱ्यांच्या शेतात चांगलं पीक येऊ दे, अशी प्रार्थना केली. सोबतच विठ्ठल रुखमाई वर प्रेम करणारे लाखो फक्त आपल्याला विविध माध्यमातून पाहायला मिळतात, अशातच नाशिक मधील सुप्रसिद्ध सुषमा चित्रकार ऐश्वर्या औसरकर यांनी देखील तूरडाळ वरती पंढरीची वारी व विठ्ठल रुखमाईचे चे सूक्ष्म चित्र काढून आपली अनोखी कला सादर केली आहे, डोळ्यांनाही दिसणार नाही अश्या लहान आकाराच्या तूरडाळ वरती रंगीत पंढरीची वारी आणि विठ्ठल रुखमाईचे चे सूक्ष्म चित्र काढून अनोखी कला दाखवण्याचा त्यांचा हा प्रयत्न खरोखरच कौतुकस्पद आहे त्यामुळे त्यांचं सर्व विविध स्तरातून व विशेषता वारकरी संप्रदायातून तोंडभरून कौतुक केले जात आहे.