निफाड

दोन लाखांवरील कर्जदार शेतकरी कर्जमाफीपासुन वंचित, मायबाप सरकारने लवकरात लवकर कर्जमाफी करावी

रामभाऊ आवारे. प्रबंधभुमी न्युज

निफाड - सद्यस्थितीत शेती आणि शेती व्यवसाय अडचणीत आला असून शेतकऱ्यांवर सहकारी संस्था पतसंस्था व बँकांचे वाढत चाललेले डोक्यावरचं कर्ज आदींमुळे शेतकरी संकटात सापडला असून सद्यस्थितीत शेतकरी वर्गाला भेडसावणारा प्रश्न म्हणजे दोन लाखांवरील कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार तरी कधी ?

  महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्या आल्या दोन लाखांपर्यंत शेतकऱ्यांची कर्ज माफ केले, परंतु दोन लाखांच्या वरील कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफीची वाट बघावी लागत असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर लगेच शासनाने दोन लाखापर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले परंतु त्यावरील कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना मात्र सरकारने अद्याप पावेतो कोणतेही पावले उचलली नसल्याने शेतकऱ्यांचे  व्याज दामदुप्पट झाले असून चालू पावसाळी अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारने  दोन लाखाच्या वरील शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन न्याय द्यावा.

     पावसाळी अधिवेशनात अर्थमंत्री तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यासंदर्भात तरतूद करून अधिवेशनात घोषणा करणे आवश्यक आहे. चालू पावसाळी अधिवेशनात अजित दादा पवार हे शेतकऱ्यांसाठी याबाबत काय निर्णय घेतात हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

  जिल्हा बँकेचे सभासद, तसेच राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये खातेदार असलेले काही हजारो शेतकरी दोन लाखाच्या वरील कर्जदार असून पाच-सहा वर्षापासून यावर्षी तरी सरकार शेतकऱ्यांसाठी काहीतरी निर्णय घेईल या आशेवर बसल्याने दाम दुप्पट वाढत चालल्याने शेतकरी वर्गाने महाविकास आघाडी बाबत नाराजी व्यक्त केली आहे.

  फडणवीस सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत सन २००८ ते २०१५ या कालावधीतील दीड लाखापर्यंत कर्ज माफ केले.सन २०१६-१७ ला जिल्हा बँकेने वाढीव कर्ज दिल्याने बहुतांशी शेतकऱ्यांनी आर्थिक टंचाईशी झगडत जुने कर्ज भरून नवीन कर्ज उचलले. मात्र सन २०१६-१७ मध्ये पीक कर्ज उचल केलेले शेतकरी चालू कर्जदार म्हणून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत कर्जमाफीपासून वंचित राहिले. महाविकास आघाडी सरकारने महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेत सन २०१६ ते २०१९ या काळातील दोन लाखापर्यंत पीक कर्ज माफ केले. यात ज्यांचे दोन लाखापर्यंत व्याजासह कर्ज होते त्यांना कर्जमाफीचा लाभ झाला. 

Related News