रामभाऊ आवारे, प्रबंधभुमी न्युज
निफाड-महाराष्ट्र शासन सिंचन विभाग पुरस्कृत असलेल्या खेरवाडी ता. निफाड येथील शांतीगिरी पाणी वापर संस्थेची निवडणूक बिनविरोध होऊन चक्राकार क्रमानुसार चेअरमनपदी नारायण कचरू संगमनेरे, व्हा चेअरमन विठ्ठल बुरके तर सचिव पदी अनिल आवारे यांची एकमताने निवड करण्यात आली.
संचालक पदी भास्कर जाधव, तानाजी संगमनेरे, भीमाबाई संगमनेरे, पुंजाराम आवारे, मोतीराम पवार, लक्ष्मीबाई संगमनेरे, काशिनाथ संगमनेरे, वेणूबाई आवारे, बाळू उगले निवड केली. संस्था हित व विकासाच्या दृष्टीने मनाचा मोठेपणा दाखवत निवडणुकीत ऐनवेळी माघार घेतलेले संदीप जाधव, शिवाजी आवारे, शिवाजी उगले, लक्ष्मीबाई पाटोळे, गणेश लांडगे, माणिक संगमनेरे, वसंत पगारे, यांच्या मुळेच निवडणूक बिनविरोध झाली. तर बिनविरोध निवडणूक झाल्याने संस्थेचा, परिणामी शासनाचा पैसा व वेळेचा अपव्यय टळला. ओल्या पार्ट्या, भांडण- तंटे, अंतर्गत दुश्मनी आदी गैरप्रकाराचे विपरीत परिणामांचे सर्व उमेदवारांना समुपदेशन करून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करणारे काशिनाथ संगमनेरे, ॲड संदीप पवार, रामदास आवारे, प्रभाकर बुरके, रमेश संगमनेरे, बाबाजी संगमनेरे, शंकर संगमनेरे, आदींचे ग्रामपंचायत, सोसायटी व तमाम शेतकरी बांधवांच्या वतीने अभिनंदन व आभार मानण्यात आले. बिनविरोध निवडणूक झाल्याने सिंचन विभागाच्या वतीने अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र देऊन सर्व विजयी उमेदवारांचा सत्कार केला. निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता सौ. सहाने, निवडणूक निर्णय अधिकारी डावरे तसेच सौ.गौतमी जाधव व रिकामे यांनी परिश्रम घेतले. सर्व विजयी उमेदवारांचे आ दिलीप बनकर व माजी आ.अनिल कदम यांनी अभिनंदन केले.