चांदवड

साकत ता अहिल्यानगर येथे विश्वगुरुंची पालखीचे आनंदात स्वागत

नंदू पगार , प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज

नाशिक : विश्वगुरू श्री संत निवृत्तीनाथ महाराज पायी पालखी सोहळा श्री क्षेत्र नगर हुन ११ वाजता प्रस्थान झाले श्री क्षेत्र साकत ता अहिल्यानगर  येथे आज सायं ०६:३० वा पालखी सोहळा विसावला यावेळी संस्थानचे अध्यक्ष कांचनताई सतीश जगताप मानकरी मोहन महाराज बेलापूरकर,जयंत महाराज गोसावी,बाळकृष्ण महाराज डावरे,संस्थानचे सचिव अमर ठोंबरे,संस्थानचे सोहळाप्रमुख नारायण मुठाळ,संस्थानचे प्रसिद्धीप्रमुख नवनाथ महाराज गांगुर्डे,संस्थानचे न विश्वस्त राहुल महाराज साळुंके विश्वस्त अनिल काका गोसावी,व जेष्ठ किर्तनकार डॉ रामकृष्णदास महाराज लहवितकर,जेष्ठ वारकरी पुंडलिक थेटे,एकनाथ गोळेसर, साकतचे सरपंच नंदू पवार आदी उपस्थित होते. यावेळी दिंडीत यावर्षी अफाट जनसागर उपस्थिती होते.प्रवासादरम्यान पोलीस प्रशासन यांनी अत्यंत चांगले नियोजन केलं.

Related News