प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज
आपल्या प्रलंबित मागण्यांसह धान्य वितरणामध्ये येणाऱ्या दैनंदीन अडचणी सोडवाव्यात, तसेच प्रलंबित असलेल्या अनेक मागणीसाठी आज रेशन दुकानदारांनी एकत्रित येत जोरदार धरणे आंदोलन केले. जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक संघटनेच्या नेतृत्वाखाली धुळे शहरातील जेल रोडवर हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी रेशन दुकानदारांनी आपली कैफियत मांडत प्रतिक्रिया दिली की, स्वस्त धान्य दुकानदारांच्या मर्जिनमध्ये महागाईच्या निर्देशांकानुसार किमान शंभर रूपये प्रति क्विंटल इतकी वाढ करावी. शासकीय धान्य गोदामातून येणाऱ्या धान्याच्या गोणी वजनात ५० किलो पेक्षा कमी भरत असल्यामुळे प्रत्यक्ष दुकानांमध्ये प्रत्येक गोणींचे ५० किलो ५८० ग्रॅम प्रमाणे वजन करुन देण्यात यावे. तसेच देण्यात येणारे धान्य हे स्वच्छ व मनुष्यास खाण्यासाठी योग्य असावे. अस्वच्छ आणि खराब धान्याचा पुरवठा करू नये अश्या विविध मागण्या घेऊन हे धरणे आंदोलन करण्यात आले. जर दोन दिवसात मागण्या मान्य झाल्या नाही तर विधानभवनावर मोर्चा काढू अशा प्रतिक्रिया यावेळी स्वस्थ धान्य दुकानदार यांनी यावेळी दिल्या.