निफाड

सोनगावच्या सरपंचपदी शिवसेनेच्या राजूबाई कांडेकर बिनविरोध, ग्रामस्थांना केशर आंब्याचे रोपटे वाटप करत वृक्षसंवर्धन...

दिनेश गोसावी पिंपळगांव बसवंत

निफाड - तालुक्यातील सोनगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम समर्थक गटाच्या राजूबाई नारायण कांडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. राजूबाई कांडेकर यांनी सरपंचपदी विराजमान होताच सोनगाव ग्रामस्थाना १५१ केसर आंब्याचे वृक्ष वाटप करुण वृक्षसंवर्धनाचा अनोखा संदेश देत आदर्श उपक्रम राबविला.
             सोनगावच्या मावळत्या सरपंच सौ.अर्चना बाळासाहेब गावले यांनी रोटेशननुसार राजीनामा दिल्याने सरपंचपद रिक्त होते. रिक्त पदासाठी सायखेडा मंडल अधिकारी श्री.पी.पी केवारे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची सभा शुक्रवारी पार पडली. सरपंचपदासाठी  राजूबाई नारायण कांडेकर यांच्या अर्जावर सूचक म्हणून संजय रामचंद्र मुरादे यांनी सही केली. दिलेल्या मुदतीत राजूबाई नारायण कांडेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री.पी.पी केवारे, यांना तलाठी कर्पे, ग्रामविकास अधिकारी श्री.सी.जे जाधव यांनी सहकार्य केले.
        यावेळी नवनिर्वाचित सरपंच राजूबाई नारायण कांडेकर यांचा सत्कार मावळत्या सरपंच अर्चना बाळासाहेब गावले व करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके-पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित सरपंच राजूबाई नारायण कांडेकर यांनी सरपंचपदी विराजमान होताच सोनगाव ग्रामस्थाना १५१ केसर आंब्याचे झाडे वाटप करुण वृक्षसंवर्धनाचा अनोखा संदेश देत आदर्श उपक्रम राबवत ग्रामस्थांना वृक्ष लागवडीचे आवाहन केले. 
            सरपंच निवडीवेळी ग्रामपंचायत सदस्य संजय मुरादे, सुधाकर गावले ,  उपसरपंच एकनाथ शिंदे , सुभाष श्रीराम कारे, अर्चना गावले, मनीषा योगेश गाडे, मछिन्द्र दत्तू खालकर, सोनाली गजीराम गावले, शारदा योगेश गावले, दीपक कांडेकर, योगेश शिवाजी गावले, योगेश गाडे, रतन कांडेकर, वसंत कांडेकर, संपतराव गांवले, पांडुरंग गांवले,  प्रकाश कारे, दिपक कारे, दौलत गावले, करंजगावचे मा.सरपंच खंडू बोडके-पाटील,  सोसायटी संचालक नितिनजी गावले, नाना खिंडे, रोहिदास गाडे, पांडुरंग कांडेकर , दिलीप गावले, बाळासाहेब नामदेव गावले , ग्रामविकास अधिकारी सि.जे जाधव, जयनाथ गावले, रोहिदास गाडे, सुरेश खालकर, भाऊसाहेब गाडे, सुनील कारे, विनायक खालकर, गजीराम गावले, गोरख गाडे, कारभारी ईखे , भगवान गाडे, निरज कांडेकर, दिपक कांडेकर,  संजय गावले, संजय कांडेकर, माधव गावले, चंद्रशेखर गावले ,समाधान जाधव, निवास खिंडे,पोपट गाडे, उद्धव गावले, सचिव सचिन खालकर, ज्ञानेश्वर गाडे, गणपत कांडेकर ,भाऊसाहेब सुकेनकर , संजय कारे, रघुनाथ कांडेकर, अशोक कांडेकर, जगन कांडेकर, दत्तात्रेय कांडेकर, पांडुरंग मुरादे, दत्तू गाडे, सोमनाथ कांडेकर, किसन खिंडे, शिवाजी कांडेकर, अशोक चिखले, पंकज कांडेकर, युवराज गाडे, ग्रामपंचायत कर्मचारी सुनील खालकर, अमोल गांडुले, बाळू कारे आदि ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.

Related News