सटाणा

नामपूर शिवारात आढळला तरूणाचा मृतदेह; घातपाताची शक्यता; वाचा सविस्तर

चेतन दाणी | प्रबंधभूमी महाराष्ट्र न्युज
बागलाण | नामपूर शिवारात एका चाळीस वर्षीय वयोगटातील तरूणाचा मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जायखेडा पोलिसांनी अज्ञात मारेकरी विरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील घोडांबा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या काटेरी झुडुपात एक मृतदेह पडून असल्याची माहिती जायखेडा पोलिसांना मिळाली त्यांनी घटनास्थळी धाव घेत सदर मृतदेह ताब्यात घेतला. सदर मृतदेहावर धारदार हत्याराने वार केल्याच्या खूणा आहेत. सदर तरूणाची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तो तेथील काटेरी झुडुपात फेकून दिला असावा असा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. या संदर्भात जायखेडा पोलीस ठाण्याचे जमादार नानासाहेब पाटील यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार पोलिसांनी अज्ञात मारेकरी विरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. जायखेडा पोलीस ठाण्याचे सहा.पो.नि. शिरसाठ हे तपास करीत आहेत.

Related News