प्रबंधभूमी महाराष्ट्र न्युज
कळवण । येथे एका चोरट्याने महिलेच्या गळ्यातील 80 हजार रूपये किंमतीची सोन्याची पोत लंपास केल्याची घटना कळवण बसस्थानकावर घडली. यासंदर्भात दिनेश शिवाजी खैरनार, नवीबेज याने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्याची आई कळवण बस स्थानकावर बस मध्ये चढत असतांना अनोळखी चोरट्याने तिच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची 80 हजार रूपये किंमतीची सोन्याची पोत चोरून नेली. हा प्रकार लक्षात येताच दिनेश खैरनार यांनी कळवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकाराने महिला व प्रवाशांत कमालीची धास्ती पसरली आहे.