प्रबंधभूमी महाराष्ट्र न्युज
धुळे : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान दि. 20 मे, 2024 रोजी पार पडले. 02- धुळे लोकसभा मतदारसंघात एकूण 60.21 टक्के मतदान झाल्याची माहिती 02-धुळे लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली.
धुळे लोकसभा मतदार संघात एकूण 60.21 टक्के मतदान झाले असून पुरुष मतदारांचे प्रमाण 62.56 टक्के, महिला मतदारांचे प्रमाण 57 66 टक्के तर इतर मतदारांचे प्रमाण 31.91 टक्के इतके आहे.
02-धुळे लोकसभा मतदार संघातील विधानसभा मतदार संघनिहाय झालेल्या मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :-
*6 धुळे ग्रामीण* : एकूण मतदारांची संख्या : 3 लाख 93 हजार 498 पैकी 2 लाख 38 हजार 512 मतदारांनी मतदान केले. (एकूण टक्केवारी 60.61 %.) पुरुष मतदार संख्या : 2 लाख 39 हजार 939, मतदान केलेले पुरुष मतदार : 1 लाख 27 हजार 466, महिला मतदार : 1 लाख 89 हजार 558, मतदान केलेल्या महिला मतदार : 1 लाख 27 हजार 466, इतर मतदार :1 मतदान केलेले इतर मतदारांची संख्या : 0.
*7 धुळे शहर* : एकूण मतदारांची संख्या : 3 लाख 43 हजार 821, पैकी 1 लाख 86 हजार 884 मतदारांनी मतदान केले. (एकूण टक्केवारी 54.36 %.) पुरुष मतदार संख्या : 1 लाख 79 हजार 568, मतदान केलेले पुरुष मतदार : 1 लाख 2 हजार 26, महिला मतदार : 1 लाख 64 हजार 226 मतदान केलेल्या महिला मतदार : 84 हजार 846, इतर मतदार : 27, मतदान केलेले इतर मतदारांची संख्या : 12.
*8 शिंदखेडा* : एकूण मतदारांची संख्या : 3 लाख 31 हजार 845, पैकी 1 लाख 89 हजार 475 मतदारांनी मतदान केले. (एकूण टक्केवारी 57.10 %.) पुरुष मतदार संख्या : 1 लाख 69 हजार 648, मतदान केलेले पुरुष मतदार : 1 लाख 3, महिला मतदार : 1 लाख 62 हजार 196, मतदान केलेल्या महिला मतदार : 89 हजार 472, इतर मतदार : 1, मतदान केलेले इतर मतदारांची संख्या : 0.
*114 मालेगाव मध्य* : एकूण मतदारांची संख्या : 3 लाख 2 हजार 391 पैकी 2 लाख 5 हजार 759 मतदारांनी मतदान केले. (एकूण टक्केवारी 68.04 %.) पुरुष मतदार संख्या : 1 लाख 57 हजार 512, मतदान केलेले पुरुष मतदार : 1 लाख 11 हजार 482, महिला मतदार : 1 लाख 44 हजार 871, मतदान केलेल्या महिला मतदार : 94 हजार 275, इतर मतदार : 8, मतदान केलेले इतर मतदारांची संख्या : 2.
*115 मालेगाव बाह्य* : एकूण मतदारांची संख्या : 3 लाख 60 हजार 815, पैकी 2 लाख 10 हजार 774 मतदारांनी मतदान केले. (एकूण टक्केवारी 58.42 %.) पुरुष मतदार संख्या : 1 लाख 89 हजार 468, मतदान केलेले पुरुष मतदार : 1 लाख 15 हजार 436, महिला मतदार : 1 लाख 71 हजार 339, मतदान केलेल्या महिला मतदार : 95 हजार 337, इतर मतदार : 8, मतदान केलेले इतर मतदारांची संख्या : 1.
*116 बागलाण* : एकूण मतदारांची संख्या : 2 लाख 89 हजार 691, पैकी 1 लाख 86 हजार 119 मतदारांनी मतदान केले. (एकूण टक्केवारी 64.25 %.) पुरुष मतदार संख्या : 1 लाख 51 हजार 793, मतदान केलेले पुरुष मतदार : 1 लाख 1 हजार 724, महिला मतदार : 1 लाख 37 हजार 896, मतदान केलेल्या महिला मतदार : 84 हजार 395, इतर मतदार : 2, मतदान केलेले इतर मतदारांची संख्या : 0.
धुळे लोकसभा मतदार संघ निवडणूकीची 20 मे रोजी जाहीर केलेली मतदानाची आकडेवारी ही अंदाजित होती. तर ही आकडेवारी सर्व मतदान केंद्राची एकत्रित आकडेवारीनुसार अंतिम असल्याचेही जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. गोयल यांनी कळविले आहेत.