प्रबंधभूमी महाराष्ट्र न्युज
धुळे : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला आज दि. 20 मे 2024 रोजी सकाळी 7.00 वाजेपासून सुरुवात झाली. 02-धुळे लोकसभा मतदारसंघातील एकूण 6 विधानसभा मतदारसंघात सांयकाळी 5 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 48.81 टक्के मतदान झाले आहे.
02-धुळे लोकसभा मतदारसंघात विधानसभा मतदार संघनिहाय झालेले मतदान टक्केवारी पुढीलप्रमाणे-
धुळे ग्रामीण-50.31 टक्के
धुळे शहर-46.16 टक्के
शिंदखेडा-45.84 टक्के
मालेगांव मध्य-57.02 टक्के
मालेगांव बाहृय-47.00 टक्के
बागलाण-47.01 टक्के
ही आकडेवारी अंदाजे असून अंतिम आकडेवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील असलेल्या 02-धुळे लोकसभा मतदार संघाच्या मतदानाला आज दि. 20 मे, 2024 रोजी सकाळी 7.00 वाजेपासून अंत्यत उत्साहात सुरुवात झाली. 02-धुळे लोकसभा मतदारसंघातील एकूण 6 विधानसभा मतदारसंघात सांयकाळी 5.00 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 48.81 टक्के मतदान झाले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली आहे.
02-धुळे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदार संघनिहाय झालेले मतदान टक्केवारी पुढीलप्रमाणे- धुळे ग्रामीण-50.31 टक्के, धुळे शहर-46.16 टक्के, शिंदखेडा-45.84 टक्के, मालेगांव मध्य-57.02 टक्के, मालेगांव बाहृय-47.00 टक्के, बागलाण-47.01 टक्के याप्रमाणे सरासरी 48.81 टक्के मतदान झाल्याची नोंद आहे.
आज सकाळी मतदानास सुरुवात होताच शहरासह ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर मतदाराच्या रांगा दिसून आल्या. सांयकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरु होती. तर काही मतदान केंद्रांवर सायंकाळी 7.00 वाजेपर्यंत मतदान सुरु होते. सहाही विधानसभा मतदार संघातील 1969 मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. त्यात पिण्याचे पाणी, उन्हापासून बचाव करण्यासाठी मंडप किंवा शेड, मतदार सहाय्य्यता केंद्र, उन्हाळयातील वाढते तापमान लक्षात घेऊन प्रथमोपचार पेट्या, आणि प्रत्येक मतदान केंद्रासाठी ओआरएसचे पाकिटे तसेच आरोग्याशी संबंधित अडचणीसाठी आरोग्य केंद्र, अंगणवाडी व बालसंगोपन केंद्र, व्हीलचेअर या सह सर्व प्रकारच्या पूरक सोयी सुविधा जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध करुन देण्यात उपलब्ध करुन दिल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, युवा, महिला व नागरिकांनी मोठया उत्साहात मतदानाचा हक्क बजावला.
स्वत: जिल्हाधिकारी अभिनव गोयल हे जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या सातपुडा सभागृहातून वेबकास्टिंगच्या माध्यमामातून मतदार संघातील 986 मतदान केंद्रासह संपूर्ण मतदान प्रकियेवर बारकाईने लक्ष ठेवून ठेऊन होते.
जिल्ह्यात मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडावी, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे धुळे लोकसभा मतदारसंघात कुठेही अनूचित प्रकार घडल्याची नोंद नाही.
लोकसभा निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढावा, याकरीता ग्रामीण भागात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपचे जिल्हा नोडल अधिकारी विशाल नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोगाच्या सुचनांनुसार मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली. तर धुळे महापालिकेच्या आयुक्त अमिता दगडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरी भागात अधिकारी, कर्मचारी यांनी गृहभेटीद्वारे नागरीकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती केली आहे.
यांनी बजावला मतदानाचा हक्क
धुळे शहरातील मातोश्री वृद्धश्रमातील 23 आजी आजोबांनी तब्बल 15 वर्षांनंतर प्रथमच आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा आयकॉन दिनेश सैदाणे यांनी या सर्व आजी आजोंबाना निवडणूक ओळखपत्र काढण्यापासून ते मतदान करेपर्यंत आवश्यक ती मदत केली. यामुळे आजी आजोबांनी जिल्हा प्रशासनाचे आभार मानले. त्याचप्रमाणे धुळे तालुक्यातील मोराणे (प्र.ल) येथील मतदान केंद्रावर धुळ्यातील संस्कार गतिमंद शाळेतील 15 विद्यार्थिंनीनी मतदान केले. यावेळी विद्यार्थिंनीसोबत बीएलओसह शाळेतील शिक्षक उपस्थित होते. शिक्षकांनी या सर्व विद्यार्थींनीना मतदान झाल्यानंतर पुन्हा शाळेत सुखरुपपणे आणले. तर जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सपत्निक मतदान केंद्रावर जात सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे रांगेत उभे राहून मतदान केले. त्याचप्रमाणे नगाव येथील आनंद विहार वृध्दाश्रमातील मतदारांनी, महिंदळे येथील कुष्ठरोग आश्रमातील मतदारांनी तसेच तृतीयपंथीय मतदारांसह मतदार संघातील युवक, तरुण, महिला, दिव्यांग, वृध्द, ज्येष्ठ नागरीकांनी उत्साहात मतदान केले.
निवडणूक निरीक्षकांची क्रिटीकल मतदार केंद्रांना भेट
धुळे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक पोलिस निरीक्षक किशन सहाय्य, निवडणूक खर्च निरीक्षक व्यंकटेश जाधव यांनी आज धुळे ग्रामीण मधील रानमळा, मोघण या क्रिटीकल तर मालेगांव मध्य व बाह्य मतदार संघातील दाभाडी तसेच गर्दीच्या मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. तसेच उच्च माध्यमिक विद्यालय, ब्राम्हणगाव ता. बागलाण येथे उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मतदान केंन्द्रावर मतदारांसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या प्रथमपोचार पेट्या, ओआरएसचे पाकिटे तसेच आरोग्याशी संबंधित सोई सुविधांची माहिती घेतली.