चांदवड

चांदवड | एसटी बसचा भीषण अपघात | अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू | अपघातात 9 जणांची प्रकृती चिंताजनक तर 15 जण किरकोळ जखमी

अमोल दिवटे, प्रबंधभूमी न्युज

चांदवड : तालुक्यातील राहुल गावाजवळ महामंडळ बस क्रमांक MH14 kQ 3631 भुसावळ - वसई या बसचा भीषण असा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे, अपघाताची भीषणता इतकी मोठी आहे की या अपघातात अर्धी बच्चा चक्काचूर झालेला आहे या अपघातात सात ते आठ जण जागीच मृत्युमुखी तसेच 22 जण गंभीर जखमी झाल्याची चुकीची माहिती प्रथम समोर आलेली होती सर्व सोशल मीडिया वरती ही चुकीची माहिती प्रसारित झालेली आहे सदर अपघातात तीन जण मृत्युमुखी झाली असून नऊ जण गंभीर जखमी आहेत तर 15 जण किरकोळ जखमी आहेत. अपघातात मृत्युमुखी झालेल्यांना आणि जखमींना चांदवड येथील सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आलेले आहेत, आणि अति गंभीर रुग्णांना चांदवड येथून पुढे पिंपळगाव, नाशिक, आणि मालेगाव  येथे उपचारासाठी हलवण्यात आलेले आहे. आपण जर या व्हिडिओमध्ये बघितलं तर आपल्याला या अपघाताची भीषणता लक्षात येईल, सदर अपघाताची पुढील अपडेट तसेच मृत व्यक्तींची नावे आणि जखमींची नावे लवकरच प्रबंध भूमीद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येतील तोपर्यंत बघत रहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज.

Related News