द्वारा : हर्षल गोसावी, प्रबंधभूमी न्युज
चांदवड | सदा नंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार या जय घोषानेे चांदवड तालुक्यातील हिवरखेडे गावात गुरुवार दिनांक 21.03.2024 रोजी सकाळी 9 वाजता श्री.साहेबराव मुरलीधर शिंदे, श्री.हरीचंद्र मुरलीधर शिंदे, श्री.दिगंबरगिरिजी महाराज(आण्णा बाबा)सोनेवाडीकर, श्री.यशवंत सपंत शिंदे, श्री दत्तू विठ्ठल शिंदे,श्री.माधव(अण्णा) हरी शिंदे, श्री.गणेश परशराम गरुड, श्री सोमनाथ दौलत आरणे,श्री.परसराम काहणू शिंदे, श्री भाऊसाहेब खंडू शिंदे,श्री रतन गोविंद पवार,श्री शंकर कारभारी ठोंबरे,श्री प्रकाश दगु शिंदे. (हीवरखेडे) यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा अर्चना करून यात्रा उत्सवाला सुरुवात झाली.या ठिकाणी पाच दिवस रात्री जागरण गोंधळ कार्यक्रम संपन्न झाला..यात्रेचे हे 34.वे वर्ष होते.या यात्रेला पाचही दिवस श्री.गणेश परशराम गरुड (हिवरखेडे) यांनी फुले व हारांचे सहकार्य केले. गुरुवर्य श्री. साहेबराव मुरलीधर शिंदे (आप्पा) यांच्या आशीर्वादाने व सहकार्याने तसेच कैलासवासी.छबू अण्णा शिंदे यांच्या आशीर्वादाने व श्री.हरिचंद्र मुरलीधर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ,सोमवार दिनांक 25.03.2024 रोजी सकाळी 9 वाजता भव्य पालखी व काठी मिरवणुक काढून सायंकाळी 5 वाजता संपुर्ण रायपूर गट यांच्या सहकार्याने श्री.हरी(भाऊसाहेब) बाबुराव आहेर (हीवरखेडे) यांनी बारा गाड्या ओढल्या,आणि सायंकाळी 7 वाजता दिवट्याचा कार्यक्रम होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम झाला, श्री.महंत दिगंबरगिरिजी महाराज (आण्णा बाबा) सोनवडिकर यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती,या वेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ,महिला वर्ग जय मल्हार भक्त मंडळ,श्री साई बाबा भक्त मंडळ, जय योगेश्वर भक्त मंडळ, जय बाबाजी भक्त परिवार, समस्त भजनी मंडळ,तरुण मित्र मंडळ व पंच कृशितील जय मल्हार भक्त मंडळ यांचे पाचही दिवस कार्यक्रमास सहकार्य होते..
प्रबंधभूमि महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी हर्षल गोसावी चांदवड..